Thu, Jun 4, 2026
प्रशासन

क्रांतीकुमार तानाजीराव पाटील यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती

क्रांतीकुमार तानाजीराव पाटील यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती
Ashok Ithape
  • PublishedAugust 8, 2025

पुणे : क्रांतीकुमार तानाजीराव पाटील यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती होवून गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे पद स्थापना करण्यात आली आहे.शासन आदेशानुसार पोलीस उप अधीक्षक / सहा. पोलीस आयुक्त (निःशस्त्र)” या संवर्गातील पदावर पदोन्नती देण्याकरिता तयार करण्यात आलेल्या “पोलीस निरीक्षक (निःशस्त्र)” या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या “नियमित निवडसूची २०२४-२५” यामध्ये समाविष्ट असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना, “पोलीस उप अधीक्षक / सहा. पोलीस आयुक्त (निःशस्त्र)” या संवर्गातील पदावर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे.

क्रांतीकुमार तानाजीराव पाटील हे सांगली जिल्यातील तांदुळवाडी गावचे सुपुत्र आहेत. क्राईम ब्रँच मधील त्यांची कामगिरी व कारकीर्द विशेष गाजली. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेवून त्यांना पुणेचे पोलीस कमिशनर अमितेशकुमार यांनी नियुक्ती पत्र दिले.व अभिनंदन केले.पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे नियुक्ती झालेल्या श्री पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!