Sat, Sep 5, 2026
सामाजिक

पद्मश्री शाहीर साबळे यांच्या जन्मदिनानिमित्त एकसर येथे सफरचंदाच्या रोपांची लागवड

पद्मश्री शाहीर साबळे यांच्या जन्मदिनानिमित्त एकसर येथे सफरचंदाच्या रोपांची लागवड
Ashok Ithape
  • PublishedSeptember 4, 2026

शाहीर साबळे प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

वाई : महाराष्ट्राचे सुपुत्र, पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून एकसर येथे शाहीर साबळे प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या परिसरात सफरचंदाच्या झाडांची लागवड करून शाहीर साबळे यांच्या स्मृतींना पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले.

शाहीर साबळे यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोककलेला नवी ओळख मिळवून देतानाच, समाजप्रबोधन आणि जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित या वृक्षारोपण उपक्रमातून त्यांच्या विचारांना आणि सामाजिक बांधिलकीला कृतीची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी सुभाष चावरे डेप्युटी इंजिनियर, सार्वजनिक बांधकाम विभाग वाई, रवी गद्रे आर्किटेक्ट पुणे, प्रशांत माने अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाई, शाहीर साबळे प्रतिष्ठान, मुख्य विश्वस्थ राधाबाई साबळे, अध्यक्ष राजाराम निकम, सचिव संजय साबळे, उपाध्यक्ष, दत्तात्रय मर्ढेकर, कोषाध्यक्ष श्रीधर जगताप, सदस्य, एन. डी. वरे, जनसंपर्क व प्रसिद्धी विभाग प्रमुख अशोक इथापे, उद्योजक बाबा जाधव, प्रकाश साबळे, राजेंद्र भिलारे, संपत वरे, संदीप आंबवले, ईश्वर तरडे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

शाहीर साबळे यांच्या जन्मभूमीत त्यांच्या स्मृती जपण्यासोबतच परिसर हिरवाईने नटविण्याचा हा उपक्रम आगामी काळातही पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. शाहीरांच्या विचारांचा वारसा आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी या दोन्ही गोष्टींचा सुंदर संगम या वृक्षारोपण कार्यक्रमातून पाहायला मिळाला.

शाहीर साबळे यांच्या जन्मभूमीत उभारण्यात येणाऱ्या स्मारक परिसरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवून हा परिसर महाराष्ट्राच्या लोककला आणि संस्कृतीचा प्रेरणादायी केंद्रबिंदू बनविण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!