Sat, Sep 5, 2026
सहकार

देशभक्त किसन वीर आबांची जयंती कारखान्यावर होणार साजरी प्रमोद शिंदे यांची माहिती

देशभक्त किसन वीर आबांची जयंती कारखान्यावर होणार साजरी प्रमोद शिंदे यांची माहिती
Ashok Ithape
  • PublishedSeptember 2, 2026

भुईंज l दि. २ : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, थोर स्वातंत्र्य सेनानी देशभक्त किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांची जयंती शुक्रवार (दि.४) रोजी कारखाना कार्यस्थळावर सकाळी १० वाजता साजरी करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, किसन वीर यांची जयंतीदिनी कारखाना कार्यस्थळावर सकाळी दहा वाजता महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असुन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ ज्ञानदेव म्हस्के उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

हा जयंती समारंभ कारखाना कार्यस्थळावर होणार असुन कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद बिगर सभासद, वाहतूक कंत्राटदार, तोडणी मशीन मालक, विविध संस्थांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहनही कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे कार्यकारी संचालक उत्तम पाटील व संचालक मंडळाने केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!