Sat, Sep 5, 2026
कृषी वार्ता

रानभाज्यांचा सन्मान व संवर्धन काळाची गरज – पालकमंत्री शंभूराज देसाई

रानभाज्यांचा सन्मान व संवर्धन काळाची गरज – पालकमंत्री शंभूराज देसाई
Ashok Ithape
  • PublishedAugust 15, 2026

सातारा दि. 15 :- रानभाज्या या नैसर्गिक पद्धतीने उगवत असून त्या शरीरासाठी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असून त्यांचा सन्मान करण्यासोबतच त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

सातारा येथील वृंदावन मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित एक दिवसीय जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

नागरिकांनी आपल्या रोजच्या आहारात रानभाज्यांचा समावेश करावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. देसाई केले, कृषी विभागाने नागरिकांना रानभाज्यांचे महत्त्व पटवून देतानाच त्यांचे संवर्धनही केले पाहिजे, रानभाजींची शास्त्रीय तसेच कोणत्या आजारावर प्रभावी आहे याची माहिती पुस्तिका महिला बचत गटांच्या महिलांना वितरीत करावी.

शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या विविध योजना असून, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचवावे. रानभाज्यांची विक्री ही रोजगाराची एक नवीन आणि उत्तम संधी आहे. तसेच रान भाज्यांना बाजार पेठेत मागणी वाढत आहे त्यामुळे या संधीचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी रानभाज्यांची बाजार पेठेत विक्री करावी, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!