Sat, Sep 5, 2026
उद्योग विश्व

जिल्ह्यात चार हजार कोटींची अधिकची गुंतवणू

जिल्ह्यात चार हजार कोटींची अधिकची गुंतवणू
Ashok Ithape
  • PublishedAugust 15, 2026

उद्योजकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 15 :- सातारा जिल्हा हा उद्योजकांसाठी सुरक्षित आहे. तरी उद्योजकांनी सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी. त्यांच्या पाठीशी शासनासह प्रशासन खंबीरपणे उभे आहे, अशी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

हॉटेल फर्न रेसिडेन्सी, सातारा येथे पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, जिल्हा उ‌द्योग केंद्राचे सहायक आयुक्त उमेशचंद्र दंडगव्हाळ यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात नवनवीन उद्योग यावे यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, सातारा, तासवडे, खंडाळा या ठिकाणी मोठे उद्योग आहेत. येथील उद्योगजकांना काही अडचणी असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा.

नागरिकांच्या हाताला काम देणे हे शासनाबरोबरच प्रशासनाचे ध्येय आहे. उद्योजकांनी सातारा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी उद्योजकांना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!