‘किसन वीर’ कडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी पाण्याचा टँकर
दि.११, भुईंज : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उदात्त हेतुने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा किसन वीर साखर कारखान्याचे चेअरमन वाई-खंडाळा- महाबळेश्वर तालुक्याचे जननायक नामदार मकरंद (आबा) पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवार्थ पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय केलेली आहे. या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पुजन किसन वीर साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव जमदाडे, प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करून तो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मार्गस्थ करण्यात आला.
आळंदीहन निघालेल्या या वारीमध्ये सर्व स्तरातुन वारकरी सहभागी होत असतात पंढरीच्या वारीमध्ये फक्त हरिनामाचा गजर व पुर्ण भक्तीभावाने वारकरी तल्लीन होत असतात, विठुरायाच्या दर्शनासाठी अतुर झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा प्रवास पायी करून पंढरपुरी दर्शनासाठी जात असतात. या वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उदभवु नये, याकरिता नामदार मकरंदआबा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांच्या नेत्वाखालील कारखाना व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवेकरिता मागील चार वर्षापासून कारखान्यामार्फत पाण्याचा टँकर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.
कार्यक्रमास कार्यालयीन अधिक्षक उमेश अंबिके, चिफ इंजिनिअर एस. जी. सुर्यवंशी चिफ केमिस्ट व्ही. एम. गाढवे, डिस्टीलरी मॅनेजर उदयसिंह भोसले, एच. आर. मॅनेजर ए.टी. शिंगटे. को-जन मॅनेजर उद्धव शिंगटे, ईडीपी मॅनेजर आर. जे. सणस, लिगल इन्चार्ज शिवाजी फरांदे, परचेस ऑफिसर संतोष जगताप, सुरक्षा अधिकारी पवनकुमार बाबर, प्रदिप जमदाडे सुनिल ससाणे यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते.





















