Fri, May 29, 2026
Close

Recent Posts

स्थानिक बातम्या

कुसगावात विद्युत डीपीला आग; मोठी दुर्घटना टळली

कुसगावात विद्युत डीपीला आग; मोठी दुर्घटना टळली
Ashok Ithape
  • PublishedMay 17, 2026

कुसगाव ता. वाई येथे विद्युत डीपी भस्मसात; नागरिकांकडून डीपी तात्काळ हलवण्याची मागणी

वाई : कुसगाव (ता. वाई) येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास गावातील मुख्य वस्तीत असलेल्या विद्युत डीपीला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सदाशिव सोनबा वरे यांच्या घराशेजारी असलेल्या या मुख्य विद्युत डीपीने काही क्षणांत पेट घेतल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती.

आगीची माहिती मिळताच गावातील तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व प्रसंगावधान राखत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या धाडसी आणि सतर्क प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली असून संभाव्य जीवित व वित्तहानी टळली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, संबंधित विद्युत डीपीचे खांब जमिनीलगत सडले असून डीपी शेजारील घरांच्या दिशेने कललेली असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण गावातील वस्तीस धोका निर्माण झाला असून नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. ग्रामस्थांनी यापूर्वीही संबंधित विभागाला वारंवार निवेदने देऊन ही डीपी सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांनी संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन धोकादायक विद्युत डीपी सुरक्षित स्थळी हलवावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!