Sat, May 30, 2026
Close

Recent Posts

शिक्षण

वाईत सौंदर्य शिक्षणाचे नवे पर्व; ‘फेमिना फ्लॉंट अकॅडमी’ची सुरभि ग्रुपकडून भव्य सुरुवात

वाईत सौंदर्य शिक्षणाचे नवे पर्व; ‘फेमिना फ्लॉंट अकॅडमी’ची सुरभि ग्रुपकडून भव्य सुरुवात
Ashok Ithape
  • PublishedMay 10, 2026

The Times Group च्या Femina ब्रँडअंतर्गत अत्याधुनिक ब्युटी, हेअर, मेकअप व वेलनेस प्रशिक्षणाची सुवर्णसंधी; स्थानिक युवक-युवतींसाठी करिअरची नवी दालने खुली

वाई : गेली तीन दशके शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुरभि ग्रुपतर्फे कौशल्याधारित शिक्षणाच्या नव्या पर्वाची सुरुवात होत असून, सुरभि अकॅडेमी ऑफ स्किल्स, वाई यांच्या पुढाकारातून देशातील प्रतिष्ठित मीडिया समूह The Times Group यांच्या Femina ब्रँडअंतर्गत ‘फेमिना फ्लॉंट अकॅडमी’ वाई येथे सुरू होत आहे.

सौंदर्य व वेलनेस उद्योग झपाट्याने विस्तारत असताना प्रशिक्षित व कुशल व्यावसायिकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर वाईसारख्या शहरातील युवक-युवतींना आधुनिक व उद्योगमान्य प्रशिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या अकॅडमीमध्ये मेकअप, हेअरस्टायलिंग, स्किनकेअर, ग्रूमिंग व बार्बरिंग या क्षेत्रांमध्ये जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. लाईव्ह मॉडेल्सवर प्रत्यक्ष सराव, ड्युअल सर्टिफिकेशन, आंतरराष्ट्रीय करिअर संधींसाठी मार्गदर्शन, अनुभवी मेंटर्सकडून प्रशिक्षण तसेच अत्याधुनिक उपकरणांसह उद्योगमान्य अभ्यासक्रम ही अकॅडमीची प्रमुख वैशिष्ट्ये ठरणार आहेत.

‘फेमिना फ्लॉंट अकॅडमी’ ही The Times Group च्या Femina या देशातील अग्रगण्य महिलांच्या मासिकाच्या समृद्ध वारशातून विकसित झालेली प्रीमियम ब्युटी अकॅडमी असून, गेल्या सहा दशकांपासून महिलांच्या जीवनशैलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या ब्रँडने आता ब्युटी व स्किल एज्युकेशन क्षेत्रातही प्रभावी पाऊल टाकले आहे.

या उपक्रमामुळे वाई व परिसरातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर न करता आपल्या शहरातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. हेअर स्टाइलिंग, पार्लर कोर्स तसेच ब्युटी उद्योजकतेसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमही येथे राबविण्यात येणार आहेत.

गेली ३० वर्षे उद्योगाभिमुख आणि रोजगारक्षम शिक्षणावर भर देणाऱ्या सुरभि अकॅडेमी ऑफ स्किल्सने विद्यार्थ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. या नव्या सहकार्यामुळे वाईमध्ये कौशल्याधारित शिक्षणाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

अकॅडमीमध्ये ग्लोबल ट्रेंड्सनुसार हेअर, मेकअप, स्किन व नेल आर्टचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि व्यावसायिक कौशल्यांचा विकास घडवून आणला जाणार आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधींबरोबरच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही दिले जाणार आहे.

“तुमच्या सौंदर्याविषयीच्या आवडीला यशस्वी करिअरमध्ये रूपांतरित करण्यासाठी ‘फेमिना फ्लॉंट अकॅडमी’ हे योग्य व्यासपीठ आहे,” असे संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले.

वाई शहरासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, स्थानिक युवक-युवतींसाठी करिअरच्या नव्या संधींचे दालन खुले होणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : सुरभि अकॅडेमी ऑफ स्किल्स, वाई
नवीन मोठ्या पुलाजवळ, किसन वीर चौक, धर्मपुरी, वाई

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!