अज्ञानाच्या अंधकारातून समस्त मानव जातीला दृष्टीकोन देणारे लोकसंत नारायण महाराज
रविवार दिनांक २१ जुलै २०२४ रोजी गुरुपोर्णिमा मोठ्या भक्तीभावाने संपन्न होत आहे त्यानिमित्त श्री क्षेत्र नारायणपुर जि. पुणे येथील विश्वचैतन्य प.पू. श्री सदगुरू नारायण महाराज उर्फ आण्णा यांच्या लोककार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा……
श्री. क्षेत्र नारायणपुर येथे रविवार दि. २१ जुलै २०२४ रोजी भव्य गुरुपोर्णिमा उत्सव मोहळा साजरा होणार देशाचे चारी दिशेला चारी धाम (आश्रम) निर्मिती करण्याचा संकल्प पुर्ण झाल्यानंतर व माणसातील माणूस जागा करणारे श्री क्षेत्र नारायणपुर येथील विश्वच्चैत्यन्य प.पू. श्री. सदगुरू नारायण महाराज (आण्णा) यांच्या शिष्य परिवार व भाविकांच्यावतीने भव्य गुरुपोर्णिमा सोहळा साजरा होणार आहे पहाटे सर्व मंदीरात अभिषेक झालेनंतर सकाळची आरती होमहवन झालेनंतर सदगुरू आण्णा महाराज व्यास महिर्षीचे पादुका पुजन करतील त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांच्यावतीने सदगुरू आण्णां महाराजांचा पादय् पुजन होईल यावेळी गुरू महिमा या विषयावर सदगुरूंचे आशिर्वादपर प्रवचन होणार आहे. या सोहळ्यासाठी देश विदेशातील भक्तांसह कन्याकुमारी, जलकोटी मध्यप्रदेश, कलकत्ता पश्चिम बंगाल, उत्तराखंड येथून शिष्य व भाविक येणार आहेत.
माणसातील माणूस जागा करणारे व देशाच्या चारी बाजुचा माणूस अध्यात्मीक संस्काराने जोडणारे श्री. क्षेत्र नारायणपूर ता. पुरंदर जि. पुणे येथील विश्वचैतन्य प.पु. श्री. सदगुरू नारायण महाराज (आण्णा) यांनी सहा दशकाहून अधिक काळ दत्तमहाराजांची उपासना व आखंड मानव जातीची सेवा करण्यात घालवली यातूनच गावोगावी मुर्ती प्रतिष्ठापना, कलशारोहन करताना ग्राम स्वच्छता व निकोप समाज निर्मीती केली यातूनच तंटामुक्त गाव एकसंघ ठेवण्याचा महामंत्र आपल्या प्रवचनातून दिला. गावाला दिशा देणारे सुसंस्कारीत भाविकांची शिवीरांच्या माध्यमातून कार्यशाळा घेणारे सदगुरू नारायण महाराज भक्ती आणि शक्तीच्या पलीकडे जावून सामुदाईक शक्तीतून बिगर हुंडा मोफत सामुदाईक विवाह सोहळा चळवळ यशस्वी करून दारिद्रय, कर्ज यातून नवी प्रकाशवाट तयार केली. शालेय विद्यार्थ्यांना बुद्धिचा कॉम्प्युटर तर शरीराचा थर्माकोल झालेची जाणीव करत त्यांना व्यायाम शाळेची तालमीची पायवाट दाखवणारे सदगुरू आण्णा महाराज एकत्रीत कुटुंब पद्धतीचा आदर्श जपा कुटुंबातील मान सन्मान संभाळून वडीलधा-यांना जपा असा हातात काठी घेवून लोकशिक्षक होणारे महाराज मी देव नाही मानसातला देव शोधा हे अधिकार वाणीने सांगतात.
आपल्या शिष्यपरीवाराला बरोबर घेवून केवळ सामुदायिक शक्तीच्या बळावर अनेक लोकपोयोगी कार्यक्रम राववणारे सदगुरू नारायण महाराज (आण्णा) यांनी कोठयावधी रूपयांची आश्रम (दत्त मंदिरे) देशाचे चारी दिशेला श्रमदानातून उभारण्याचा संकल्प पूर्ण केला भाषा वर्म या पलिकडे जावून मानसा तु मानसा सारखा वाग हे ब्रीद वाक्य घेवून माणसांच्या मनावर मशागत करून निकोप समाज व्यवस्था व एकसंघ गावपण राखण्याचा प्रयन केला आहे. सहा वर्षापुर्वी नारायण धाम नावाचे निसर्ग उपचार केंद्र देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय पाटील, शिक्षणतज्ञ शं. या मुजुमदार, व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत लोकांच्या सेवेसाठी
हे निसर्ग उपचार केंद्र व आयुर्वेद वनस्पती संशोधन केंद्र सुरू करण्यात आले यावेळी उद्घाटनाच्यावेळी जेष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या आज पर्यंतच्या प्रवासात बालपनी लोकसंत गाडगे महाराज यांच्या पाया पडलो व आज लोकसंत नारायण महाराज (आण्णा) यांच्या सहवासात आल्यानंतर आपण पुन्हा एकदा गाडगे महाराजांच्याच पाया पडत असल्याचा दाखला दिला कोणतेही कर्मकांड व लिंबू नारळ न देता देशातील माणसांचा मानुस जोड प्रकल्प राववणारे नारायण महाराज यांच्या नारायण ज्ञानवोध या ग्रंथाच्या सामुदायिक पारायण सोहळयातून पुन्हा एकदा निरूपन करणारे जेष्ठ शिष्य वैभव काका काळे सदगुरू आण्णा महाराजांचे साहित्यातून प्रबोधन करण्याची चळवळ राववत आहेत. तर नारायण धाम या आर्युवेदिक निसर्ग उपचार केंद्रातून प्रकृतीतून विघडलेली माणसं नव्याने पुर्ण जन्म घेत आहेत. आपण शिर्डीचे साईवाया पाहिले नाहीत अखंड विश्वाची माऊली ज्ञानेश्वर महाराज यांना पाहिले नाही परंतु दोन्हीही संताचा संगम सदगुरू नारायण महाराज यांच्या दर्शनाने होते. त्यामुळेच येणा-या प्रत्येकाला नारायणपूरला अध्यात्मिक ऊर्जा येथे मिळणार आहे तर किल्ले पुरंदराच्या पायथ्याशी निसर्ग व अद्यात्म यांची सांगड घालत माणसाला निरोगी व सशक्त करण्यासाठी आण्णा महाराज आता लोकांचे पालक म्हणुन काळजी घेत आहेत.
सामुदाईक श्रमदान व एकीच्या बळावर महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात आपले अनुयायी निर्माण करणारे सदगुरू आण्णा महाराज यांनी शिष्यांचे समुह निर्माण केले यातूनच सामुदाईक शेती ते श्रमदान असे अनेक उपक्रम राववले जातात. माणुस जोड अभियान अंतरगत देशाच्या चारही बाजूला एकमुखी दत्त महाराजांचा संदेश देत पोहचला आहे. महाराजांचे या राष्ट्रीय कार्यास माझी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जी. अब्दुलकलाम यांनी शुभेच्छा देवून सलाम केला होता. दिवंगत गांधीवादी नेते व धोर विचारवंत बाळासाहेब भारदे दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, यांनी महाराजांचे अनेक ग्रंथांना प्रस्तावना लिहून त्यांचे ग्रंथ संपदेचे कौतुक केले होते. माजी आमदार उल्हासदादा पवार, अॅडव्होकेट शशिकांत पागे यांच्या सारखे जेष्ठ शिष्य येथील दत्त महिमा नेहमीच सांगतात.
जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते. श्री सदगुरू नारायण महाराजांनी मानव जातीला नवा कानमंत्र देताना भुईंज येथील भृगुऋषी ते उत्तराखंड येथील कपीलमुनी ऋषी यांची ऋपी परंपरा प्रत्यक्ष कृतीतुन शिष्यांच्या समवेत चारीधाम निर्माण करून संकल्प पुर्ण केला त्यामुळे जिथे विज्ञान थांबते तेथे अध्यात्म सुरू होते. असेच म्हणावे लागेल.
श्रीक्षेत्र नारायणपूरचा उत्सव सोहळा जगभरात दिसण्यासाठी शिष्य परिवाराने www.shreedattadham.com या बेवसाईटवरून थेट प्रक्षेपण पाहावयास मिळणार आहे अशी माहिती सेवेकरी मंडळाच्यावतीने पोपटमहाराज स्वामी, भरतनाना क्षिरसागर, दिगंबर भिंतांडे, रवि कदम व विजय क्षिरसागर यांनी दिली.













