Sat, Sep 5, 2026
मनोरंजन

“ना ते आपुले” नाटकाला पुरस्कारांची हॅट्रिक

“ना ते आपुले” नाटकाला पुरस्कारांची हॅट्रिक
Ashok Ithape
  • PublishedJune 8, 2026

डॉ. विजयकुमार देशमुख यांच्या नाट्यलेखनाला परिमल साहित्य सेवा पुरस्कार जाहीर; आशिर्वाद, महामृत्युंजय आणि परिमल पुरस्कारांची सलग मानकरी

मुंबई,  ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विजयकुमार देशमुख यांच्या “ना ते आपुले” या नाट्यकृतीला पंढरपूर येथील परिमल सांस्कृतिक व्यासपीठतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा “परिमल साहित्य सेवा पुरस्कार” जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, आशिर्वाद पुरस्कार (मुंबई), महामृत्युंजय पुरस्कार आणि आता परिमल साहित्य सेवा पुरस्कार अशा सलग तीन पुरस्कारांनी या नाटकाचा गौरव झाला असून, साहित्य क्षेत्रात या नाटकाने पुरस्कारांची हॅट्रिक साधली आहे.

“ना ते आपुले” या नाटकामध्ये स्त्रीच्या वेदना, संघर्ष आणि भावविश्वाचे अत्यंत सखोल व संवेदनशील चित्रण करण्यात आले आहे. या नाटकातील आशय, पात्रांची मांडणी आणि सामाजिक वास्तवाचे प्रभावी प्रतिबिंब यामुळे वाचकांना अंतर्मुख करणारा अनुभव मिळतो. या गाजलेल्या नाटकाचे प्रकाशन ग्रंथाली प्रकाशन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

डॉ. विजयकुमार देशमुख यांच्या साहित्य प्रवासात ही आणखी एक मानाची भर ठरली आहे. यापूर्वीही त्यांच्या विविध साहित्यकृतींना राज्यस्तरीय आणि नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. “ना ते आपुले” या नाटकाला मिळालेली पुरस्कारांची ही हॅट्रिक त्यांच्या साहित्यिक कार्याची पावती मानली जात आहे.

या पुरस्काराचे वितरण पंढरपूर येथे १३ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित विशेष समारंभात करण्यात येणार आहे. तसेच या लोकप्रिय आणि चर्चित नाटकाचा हिंदी अनुवाद पुणे येथील डॉ. सुमेधा हर्षे यांनी केला असून तो लवकरच प्रकाशित होणार आहे.

साहित्यप्रेमी आणि वाचकवर्गाकडून डॉ. विजयकुमार देशमुख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!