Sat, Jun 13, 2026
Close

Recent Posts

पोलीस डायरी

वाई एसटी स्टँडवरून चोरी गेलेले २ तोळे सोन्याचे मंगळसूत्र गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून जप्त; महिला आरोपीस अटक

वाई एसटी स्टँडवरून चोरी गेलेले २ तोळे सोन्याचे मंगळसूत्र गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून जप्त; महिला आरोपीस अटक
Ashok Ithape
  • PublishedJune 12, 2026

सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्याचा छडा; सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

वाई, दि. ११ : वाई एसटी स्टँड परिसरात चोरी झालेल्या २ तोळे वजनाच्या सोन्याच्या मंगळसूत्राचा गुन्हा वाई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या तपासाच्या जोरावर उघडकीस आणला आहे. या प्रकरणी एका महिला आरोपीस अटक करण्यात आली असून तिच्याकडून सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.

दि. ०१ जून २०२६ रोजी श्रीवर्धन ते सातारा जाणाऱ्या बसमध्ये प्रवास करत असताना फिर्यादी दिशा निखील कांबळे यांच्या पर्समधील २ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलीस कर्मचारी विक्रम घोळे यांनी वाई एसटी स्टँड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये संशयास्पद हालचाल करणारी महिला आढळून आल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून संबंधित महिलेला ताब्यात घेतले.

चौकशीत संशयित महिला जयपाल लक्ष्मण पवार (रा. पारधी वस्ती, शिरूर) हिने गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाच्या परवानगीनंतर तिला अटक करण्यात आली असून तिच्याकडून चोरीस गेलेले मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सावळखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली. या कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कौतुक केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!