Sat, Jun 13, 2026
Close

Recent Posts

पोलीस डायरी

वाई पोलिसांची मोठी कामगिरी; महाराष्ट्रासह इतर राज्यांतील चोरीचे २७ मोबाईल शोधून मालकांना केले परत

वाई पोलिसांची मोठी कामगिरी; महाराष्ट्रासह इतर राज्यांतील चोरीचे २७ मोबाईल शोधून मालकांना केले परत
Ashok Ithape
  • PublishedJune 12, 2026

सुमारे ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत; तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेची यशस्वी कारवाई

वाई, दि. ११ : वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून चोरीस गेलेले व हरवलेले एकूण २७ मोबाईल फोन शोधून काढले असून ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे ५ लाख ५० हजार रुपये इतकी आहे.

सातारा जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या वाई शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा होत असते. बाजारपेठ, प्रवास व गर्दीच्या ठिकाणी मोबाईल हरवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने वाई पोलीस ठाण्याने या तक्रारी गांभीर्याने घेतल्या.

पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व पोलीस कर्मचारी विशाल शिंदे यांनी तांत्रिक विश्लेषण व तपासाच्या आधारे महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतून हे मोबाईल शोधून काढले व तक्रारदारांच्या ताब्यात दिले.

वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने मे २०२४ पासून आतापर्यंत एकूण ३७५ विविध कंपन्यांचे नामांकित मोबाईल शोधून तक्रारदारांना परत केले असून या कामगिरीमुळे नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साबळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अभिनंदन केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!