Mon, Mar 2, 2026
सहकार

अजिंक्यतारा साखर कारखाना कार्यस्थळावर ऊस पिक शेतकरी कार्यशाळेस शेतकरी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

अजिंक्यतारा साखर कारखाना कार्यस्थळावर ऊस पिक शेतकरी कार्यशाळेस शेतकरी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
Ashok Ithape
  • PublishedJune 7, 2024

भुईंज : महेंद्रआबा जाधवराव

बदलत्या हवामान परिस्थितीत पर्यावरण पूरक खोडवा उसाच्या शाश्वत व विक्रमी उत्पादनासाठी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना मर्या शाहूनगर शेंद्रे व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ कृषी महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पिक शेतकरी कार्यशाळेचे स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे सांस्कृतिक भवन येथे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेस शेतकरीवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यशाळेत माती व पाणी चिकित्सालय, कृषी महाविद्यालय पुणे येथील व्यवस्थापक डॉ.धर्मेंद्रकुमार फाळके यांनी हवामानातील बदल आणि या बदलांचा ऊस पिकावर होणारा परिणाम याविषयी माहिती सांगितली. तसेच कमी खर्चामध्ये ऊस उत्पादन कसे घ्यावे, रासायनिक सेंद्रिय खतांचा वापर , ठिबक सिंचनाचे महत्त्व,माती परीक्षणाची गरज शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर ,पाचट अच्छादन व पाचटीचे खत म्हणून होणारे फायदे आणि हवा हवामान बदलांचा परिणाम लक्षात घेऊन करावयाच्या उपायोजना या संदर्भात शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

ऊस रोग शास्त्रज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील डॉ .सुरज नलवडे यांनी ऊस उत्पादन वाढीसंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. तसेच पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव व ते रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. जिल्हा मध्य.बँकेचे कृषी अधिकारी अमृत भोसले यांनीही शेतकरी वर्गासाठी बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाची माहिती दिली.

प्रास्तविक भाषणात अजिंक्यतारा कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते म्हणाले, अजिंक्य उद्योग समूहाचे मार्गदर्शक आ.श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व संचालक मंडळाचे मार्गदर्शनाखाली व ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांच्या सहकार्यातून साखर उद्योग क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करीत आहे. शेतकरी सभासदांचे सर्वांगीण हित डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणाऱ्या अजिंक्यतारा कारखान्याची निवड या कार्यशाळेसाठी केल्याबद्दल त्यांनी संयोजकांचे विशेष आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य शेती अधिकारी यांनी केले तर ऊस विकास विभागाचे ॲग्री ओव्हरसिअर प्रसाद सावंत व सर्व सहकारी कर्मचारी यांनी उपस्थित शेतकरी वर्गाची चोख व्यवस्था ठेवली.

आभार माजी व्हा. चेअरमन विश्वास शेडगे यांनी मानले.
कार्यक्रमास चेअरमन यशवंतराव साळुंखे व सर्व संचालक मंडळ, माजी चेअरमन सर्जेराव सावंत, श्रीहरी देशमुख, प्रतिभा कांबळे, अमित जाधव,रुपेश वैद्य, डॉ.महेश बाबर, राजू पाटील, मोहनराव साळुंखे ,जयवंतराव शेलार ,सुनील निकम, प्रभाकर शिंदे ,राजेंद्र घोरपडे, पांडुरंग साळुंखे ,विजय घोरपडे इत्यादी मान्यवर तसेच ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!