Mon, Mar 2, 2026
पर्यटन

पश्चिम घाट एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यातील प्रतापगड येथील कामांना सुरुवात

पश्चिम घाट एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यातील प्रतापगड येथील कामांना सुरुवात
Ashok Ithape
  • PublishedMarch 14, 2024

आठ दिवसात सर्व प्रक्रिया करुन प्रशासकीय मंजुरी देण्यात आली

सातारा दि. 14 (जिमाका) : सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनस्थळे विकासाचा रुपये 381.56 कोटीचा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यास (Western Ghat Integrated Religious, Historical, Eco- Tourism Circuit Plan) पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी मान्यता दिली. त्यानंतर दिनांक 22 फेब्रुवारी, 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता देवून शासनाने दिनांक 05 मार्च, 2024 रोजी आराखडा मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला. त्यानुसार पुढील स्थळांच्या ठिकाणी प्राप्त रक्कम रु. 381.56 कोटींची करावयाच्या कामांना मंजुरी प्राप्त झाली.

सह्याद्री व्याघ्र राखीव वनक्षेत्रातील पर्यटन विकास आराखडा रु. 44.49 कोटी, कोयना हेळवाक वन झोन अंतर्गत कोयना नदी जलपर्यटन आराखडा रु. 22 कोटी, प्रतापगड किल्ला जतन आणि संवर्धन रु. 127कोटी 15लाख, श्री क्षेत्र महाबळेश्वर पर्यटन विकास आराखडा रु. 187कोटी 42 लाख.
आराखडयातील उपरोक्त कामांपैकी प्रतापगड किल्ला जतन आणि संवर्धन करण्याच्या रक्कम रुपये 127कोटी 15 लाखांच्या कामांपैकी शासन मंजुरीनंतर आठ दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करून रु. 27 कोटी एक लाखाच्या या कामास दिनांक 14 मार्च 2024 रोजी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून सहाय्यक संचालक पुरातत्त्व विभाग पुणे यांच्यामार्फत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली.  थोड्याच दिवसात सदर कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!