Mon, Mar 2, 2026
सामाजिक

राजधानी सातारा येथून मावळ्यांची फौज मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे रवाना

राजधानी सातारा येथून मावळ्यांची फौज मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे रवाना
Ashok Ithape
  • PublishedJanuary 24, 2024

राजधानी सातारा येथील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मावळ्यांची फौज मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे रवाना

भुईंज । महेंद्रआबा जाधव

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं आंदोलनं, उपोषणं करणारे मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. २६ जानेवारीला मुंबईत मनोज जरांगे आमरण उपोषण करणार आहेत. जालन्यातील त्यांच्या अंतरवाली सराटी या गावातून निघतानाच त्यांनी तसा इशारा दिला होता.

मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होऊन ढिम्म शासनाला जागे करण्यासाठी सातारा येथील मराठा सकल समाजातील मराठा बंधू-भगिनी यांनी ढोल ताशांच्या निनादात आणि एक मराठा कोटी मराठा च्या जयघोषात शिवतीर्थावर जावून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. यानंतर ‘आरक्षण घेतल्या शिवाय माघार नाही’ असा निर्धार करीत लाखो मावळ्यांनी मुंबईच्या दिशेने कुच केली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!