Thu, Jun 4, 2026
नोकरी मार्गदर्शन

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 15 डिसेंबर रोजी आयोजन

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 15 डिसेंबर रोजी आयोजन
Ashok Ithape
  • PublishedDecember 12, 2023

सातारा, दि.12:   जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यावतीने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 15 डिसेंबर रोजी कृष्णाकाठ इन्स्ट्ट्यिुट फॉर स्किल डेव्हलपमेंट ॲण्ड रिसर्च, नगर परिषद जवळ कराड येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राकडून देण्यात आलेली आहे.

या मेळाव्यात 8 वी, 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इंजिनिअर, कुशल, अर्धकुशल कामगार अशा प्रकारच्या 1 हजार 200 पेक्षा जास्त रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केली आहेत.  या रोजगार मेळाव्यास कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित रहावे, काही अडचणी असल्यास कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवहनही जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!