वाई तालुका कचरामुक्त करण्याचा मानस – श्री.नारायण घोलप, गटविकास अधिकारी पंचायत समिती वाई
वाई l प्रतिनिधी: दि. ०१ ऑक्टोंबर
स्वच्छता हि सेवा अभियान अंतर्गत कचरा मुक्त भारत हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने वाई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये दि २ ऑक्टोम्बर ते १५ ऑक्टोंबर या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि 1 ऑक्टोम्बर रोजी महा श्रमदान दिन संपूर्ण तालुक्यात सर्व ग्रामपंचायती मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत वेळे ता. वाई येथे स्ववच्छता शपथ, गावातील सर्व परिसर, सार्वजनिक ठिकाणे, राष्ट्रीय महामार्ग परिसर या ठिकाणाची स्वच्छता, गृहभेटी, प्रभात फेरी काढण्यात आली. या वेळी प्लास्टिक कचरा संकलन करण्यात आला, गावामध्ये एकल प्लास्टिक वापरा बाबत जन जागृती करण्यात आली तसेच जिल्हातील सर्वात प्रथम उभारण्यात आलेल्या गोबरधन प्रकल्प ठिकाणाची स्वच्छता करण्यात आली.
तालुक्यामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प सर्व ग्रामपंचायती मध्ये प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये गावातील ओला कचरा व सुका कचरा यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नॅडेप, गांडूळ खत प्रकल्प, प्लास्टिक संकलन व सांडपाण्यासाठी सार्वजनिक शोषखड्डा, रूट झोन सिस्टीम, डी -व्हॅट सिस्टीम अशा उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती कचरा मुक्त गावे होण्यासाठी तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना ग्रामपंचायती गाव निहाय वाटप करण्यात आलेले आहे त्याप्रमाणे गावामध्ये स्वच्छता उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले.
यावेळी सर्व प.स. पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ यांनी उस्फुर्त सहभाग घेतला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी घनकचरा व सांडपाण्याचे शास्वत स्वरूपात योग्य प्रकारे नियोजन करण्यात यावे असे आव्हाहन करण्यात आले.
यावेळी वेळे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री इनामदार, उपसरपंच, ग्रामपंचातीचे सदस्य, विस्तार अधिकारी रुपेश मोरे, राहुल हजारे, तालुका समन्वयक SBM/NRLM, युवा मंडळे, बचतगट, ग्रामस्थ, शाळेचे शिक्षक, विध्यार्थी, ग्रामसेवक श्री. डेरे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.













