Wed, Mar 4, 2026
क्रीडा

खेळातून घडते यशस्वी पिढी; जिल्हास्तरीय मॅरेथॉनमध्ये बोरगाव शाळेचा डंका

खेळातून घडते यशस्वी पिढी; जिल्हास्तरीय मॅरेथॉनमध्ये बोरगाव शाळेचा डंका
Ashok Ithape
  • PublishedMarch 4, 2026

वाई | प्रतिनिधी : रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खंडाळा बावडा येथे पार पडलेल्या खंडाळा जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत बोरगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली.

५ कि.मी. धावणे स्पर्धेत बोरगाव शाळेच्या विद्यार्थिनींनी अव्वल तीनही क्रमांक पटकावत स्पर्धेवर वर्चस्व गाजवले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक – कु. नितेजा नारायण धनावडे (इयत्ता ९ वी),द्वितीय क्रमांक – कु. आकांक्षा संतोष जाधव (इयत्ता ८ वी),तृतीय क्रमांक – कु. सृष्टी कृष्णदेव कळंबे (इयत्ता ९ वी) यांनी मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.

या यशाबद्दल वाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसार मंडळ संस्थेचे अध्यक्ष श्री. नारायणराव वाडकर, सचिव श्री. मधुकर वाडकर, संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. लक्ष्मणराव वाडकर तसेच सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले.

यशस्वी खेळाडूंना मुख्याध्यापक श्री. संतोष वाडकर, भागशाळा प्रमुख श्री. विठ्ठल जाधव, प्रशिक्षक व क्रीडाशिक्षक श्री. अजित वाडकर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ व पालकांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या यशामुळे बोरगाव शाळेच्या क्रीडा परंपरेला नवे बळ मिळाले असून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!