Sat, Sep 5, 2026
सातारा जिल्हा

सातारा येथील माजी सैनिक संपर्क अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद

सातारा येथील माजी सैनिक संपर्क अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद
Ashok Ithape
  • PublishedFebruary 24, 2026

सातारा दि. 23- बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुप सेंटर, रेकॉर्डस व सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सातारा येथे महासैनिक भवन येथे जिल्हास्तरीय संपर्क अभियान राबविण्यात आले. या अभियांनातर्गत रेकॉर्ड ऑफिस बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुप, पुणे, मराठा लाईट इफेन्ट्री रेकॉर्ड ऑफिस, बेळगांव, आर्मड कोर रेकॉर्डस ऑफिस, अहिल्यानगर, आटलरी रेकॉर्डस ऑफिस, नाशिक आणि मेकानाईज इफेन्ट्री रेकॉर्डस ऑफिस, अहिल्यानगर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांनी लावलेल्या विशेष स्टॉलद्वारा माजी सैनिकांच्या निवृत्तीवेतन, अवलंबितां कागदपत्रे, स्पर्श पेंशन, ई. सी. एच. एस. कार्ड तथा आधार कार्ड, पेंशन या बँक संबंधित सर्व समस्या सोडविण्यात आल्या. तसेच माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांच्या वैयक्तिक अडी अडचणी/प्रलंबित समस्यांचे निवारण करण्यात आले.

साताऱ्यातील या जिल्हास्तरीय संपर्कअभियानास जवळपास १५५० पेक्षा अधिक माजी सैनिक, सेवारत सैनिक, वीरपिता, वीरमाता, वीरपत्नी, माजी सैनिक विधवा पत्नींनी हजेरी लावली. यावेळी माजी सैनिक कल्याणकारी योजनांबाबत आणि कौशल्य विकास योजना याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी व अवलंबितांच्या समस्याचे निराकरण करण्यात आले. या अभियाना दरम्यान मेडिकल व डेंटल कॅम्पची सुविधा ई. सी. एच. एस. सातारा यांचेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली होती.

या संपर्क अभियानास, बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुप अँड सेंटर खडकी, पुणेचे डेप्युटी कमांडेन्ट लेफ्टनंट कर्नल कर्नल अमनदिप सागर, उपसंचालक, सैनिक कल्याण विभाग पुणे, तथा सातारा व पुणे जिल्ह्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेश दैवानराव हंगे (निवृत्त), बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुप, पुणे येथील रेकॉर्ड ऑफिसर-ई-चार्ज कर्नल मुलचंद गुर्जर, लेफ्टनंट कर्नल विनीत कालोखे, भारताच्या इंजिनियर-इन-चीप चे रेजिमेंटल स्टाफ ऑफिसर, लेफ्टनंट कर्नल प्रकाश नरहरी (निवृत्त), ऑफिसर-ई-चार्ज ई. सी. एच. एस. सातारा, लेफ्टनंट कर्नल अनिल गोगवले (निवृत्त), कामाडेंट मेस्को ट्रेनिंग अॅकॅडमी, सातारा, डॉ. अनिल एम. शिंदे, सातारा हॉस्पिटल सातारा आणि मुलांना संजीवनी या संकल्पनेचे जनक प्रो. अशोक चंद माथुर, IIT अहमदाबाद तसेच देवराई संकल्पनेचे जनक रघुनाथ ढोले उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!