Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

छत्रपती.ना.शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते कैलास कुंभार यांचा सत्कार

छत्रपती.ना.शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते कैलास कुंभार यांचा सत्कार
Ashok Ithape
  • PublishedOctober 3, 2025

सातारा / प्रतिनिधी : कोडोली येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व दीपलक्ष्मी चारिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष कैलास कुंभार यांनी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमात मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

गेल्या तीन दशकांपासून समाजसेवा, पत्रकारिता बँकिंग व उद्योजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असलेले कैलास सदाशिव कुंभार यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या व जन संज्ञापन पदविका अभ्यासक्रमाच्या वार्षिक परीक्षेत साताऱ्याच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालय अभ्यासकेंद्रात प्रथम श्रेणी संपादन केले असून या यशाबद्दल नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांचा सत्कार केला.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे कैलास कुंभार यांचे पत्रकारिता क्षेत्रातील कार्यही उज्वल ठरो, अशा शुभेच्छा ना. भोसले यांनी यावेळी दिल्या.

दरम्यान पोलीस क्राईम नामा या वृत्तवाहिनीचे संपादक व माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून कैलास कुंभार यांनी केलेल्या कार्याचाही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आवर्जून उल्लेख केला.
यावेळी नामदार भोसले यांच्या सुरुची निवासस्थानी उपस्थित असलेल्या प्रमुख सामाजिक, राजकीय कार्यकर्ते व मान्यवरांनीही श्री. कुंभार यांना शुभेच्छा दिल्या व पत्रकारिता परीक्षेतील यशाबद्दल अभिनंदन केले.

कैलास कुंभार यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून समाजसेवेत आणि पत्रकारितेत सक्रिय राहून सामाजिक बांधिलकी जपणार असल्याचे आवर्जून सांगितले.
या यशाबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे, कपिल राऊत, दीपलक्ष्मी ट्रस्टच्या सौ. लक्ष्मी कुंभार आदींनी श्री. कुंभार यांचे अभिनन्दन केले व शुभेच्छा दिल्या.

फोटो ओळी : कैलास कुंभार यांचा सत्कार करताना नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!