Mon, Mar 2, 2026
क्राईम न्यूज

मुंबई सीमाशुल्क विभाग झोन-III कडून सीएसएमआय विमानतळावर ₹5.11 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

मुंबई सीमाशुल्क विभाग झोन-III कडून सीएसएमआय विमानतळावर ₹5.11 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त
Ashok Ithape
  • PublishedJune 30, 2025

मुंबई सीमाशुल्क विभाग झोन-III ने 27 जून 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय (सीएसएमआय) विमानतळावर एका भारतीय नागरिकाला ताब्यात घेतले. सदर प्रवासी इंडिगो फ्लाइट क्र. 6 इ 1052 द्वारे बँकॉकहून भारतात दाखल झाला होता.

प्रवाशाच्या नोंदवलेल्या सामानाची तपासणी आणि वैयक्तिक झडतीदरम्यान अधिकाऱ्यांनी, हायड्रोपोनिक पद्धतीने पिकवलेला 5,119 ग्रॅम गांजा हस्तगत केला. तो सामानामध्ये लपवून ठेवण्यात आला होता. जप्त केलेल्या या अमली पदार्थाचे बेकायदेशीर बाजारमूल्य अंदाजे ₹5.119 कोटी आहे.

अंमली पदार्थ आणि मानसिक प्रभाव टाकणारी द्रव्ये (एनडीपीएस ) कायदा, 1985 अंतर्गत सदर अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. प्रवाशाला तात्काळ अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!