Fri, Jul 24, 2026
Close

Recent Posts

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” प्रभावीपणे राबवा; महिलांपर्यंत आणि वंचित घटकांपर्यंत सर्व योजनांचा लाभ पोहोचवा – आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सातारा जिल्हा प्रशासनास सूचना

“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” प्रभावीपणे राबवा; महिलांपर्यंत आणि वंचित घटकांपर्यंत सर्व योजनांचा लाभ पोहोचवा – आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सातारा जिल्हा प्रशासनास सूचना

कृषी वार्ता

‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत मौजे बाहुळे येथे भात लावणी व शेतकरी संवाद संपन्न

‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत मौजे बाहुळे येथे भात लावणी व शेतकरी संवाद संपन्न
Ashok Ithape
  • PublishedJuly 24, 2026

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात रोटर चालवून केली चिखलणी; अधिकाऱ्यांनी घेतला भात लावणीचा आनंद

सातारा दि. २३: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत आज, दिनांक २३ जुलै २०२६ रोजी, मौजे बाहुळे (ता. जावली, जि. सातारा) येथे कृषी विभाग व महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बाहुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतावर सुधारित चारसूत्री भात लागवड प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पडले.
या प्रसंगी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री फरांदे यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून चिखलणी करत भाताची लावणी केली.

विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्वतः शेतावर रोटर चालवून चिखलणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि उपक्रमातील ‘बळीराजाशी नाळ जोडणारा’ उद्देश सार्थ ठरवला.

शेतकऱ्यांशी संवाद व समस्यांचे निवारण
भात लावणीनंतर आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. आधुनिक तंत्रज्ञान, चारसूत्री भात लागवडीचे फायदे आणि कृषी योजनांवर त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच, शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेत त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती
या प्रसंगी जावली तालुक्याचे तहसीलदार श्री. प्रवीण मुदगल, तालुका कृषी अधिकारी श्री. प्रकाश राठोड, मंडल कृषी अधिकारी (मेढा) श्री. बापूसाहेब रुपनवर, उपकृषी अधिकारी श्री. प्रसाद फडतरे व श्री. दत्तात्रय जाधव उपस्थित होते.

तसेच सहाय्यक कृषी अधिकारी सर्वश्री वैभव डोईफोडे, मिलिंद बर्गे, भानुदास चोरगे, संतोष इंगवले, विलास कदम, सचिन बेसके, विशाल डंगारे, धनंजय सापते, नितीन जांभळे, अनिल चव्हाण, रामकृष्ण डंगारे यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी शेतात उतरून भात लावणीचा आणि ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमाचा मनापासून आनंद लुटला. या उपक्रमामुळे कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यास मदत झाली असल्याचे मत स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!