Tue, Jul 21, 2026
महाराष्ट्र

‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कार’ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व अभिनेते श्रीरंग गोडबोले यांना जाहीर

‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कार’ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व अभिनेते श्रीरंग गोडबोले यांना जाहीर
Ashok Ithape
  • PublishedJuly 20, 2026

इंडियन स्टुडंट कौन्सिलचा सन्मान; १६ ऑगस्ट रोजी चिपळूण येथे होणार पुरस्कार वितरण सोहळा

चिपळूण, प्रतिनिधी : समतावादी विचारांचा प्रसार आणि सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने इंडियन स्टुडंट कौन्सिलच्या वतीने प्रदान करण्यात येणारा ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कार’ २०२६-२७ या वर्षासाठी जाहीर करण्यात आला आहे. यंदा राजकीय क्षेत्रातील पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री मा. ना. रामदास आठवले यांना, तर सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते, लेखक व दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांना जाहीर करण्यात आला आहे.

माहिती व तंत्रज्ञानाच्या युगातील विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापकांची समतावादी संघटना म्हणून कार्यरत असलेल्या इंडियन स्टुडंट कौन्सिलतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जात आहे.
यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

यापूर्वी या पुरस्काराने अभिनेते संजय खापरे, एबीपी माझाच्या उपकार्यकारी संपादिका सरिता कौसिक, अभिजीत हेगशेट्ये, अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेत्री चिन्मयी सुमित, डॉ. दीपक चिद्दरवार, डॉ. सम्राट माने, अभिनेते हर्षद शिंदे, डॉ. आशीर्वाद लोखंडे तसेच अनिल कलकुटकी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे.

या पुरस्कारांची घोषणा इंडियन स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम यांनी केली. यावेळी प्रा. माधुरी राऊत, डॉ. धनाजी थोरे, डॉ. रोहित गायकवाड, डॉ. सीमा शेटे, डॉ. माधवी महाके, डॉ. मीता रामटेके, प्रा. डॉ. रेखा बडोदेकर, प्रा. डॉ. रजनी महेशकर, प्रा. डॉ. संयोगिता सासणे, डॉ. अनिता पाटील, सारिका शिंदे, सुवर्णा शिंदे, कॅप्टन मोहन गुजरकर, अश्विनी दीक्षित, सोनिया इथापे, डॉ. कल्पना शिंदे, अंजली कुंदर्गी, प्रा. रूपेश भालेकर, आकाश मकेश्वर, प्रा. दिपाली कु-हाडे, मीना राजेंद्र साळुंके, श्रुती कांबळे आणि लीना चव्हाण उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!