Thu, Jul 23, 2026
सामाजिक

सर्वसामान्य जनतेचा हक्काचा व कामाचा माणुस हरपल्याचे दुःख

सर्वसामान्य जनतेचा हक्काचा व कामाचा माणुस हरपल्याचे दुःख
Ashok Ithape
  • PublishedJuly 23, 2026

वाई येथील सर्व रोग निदान शिबीरास उत्स्फूर्त सहभाग: प्रमोद शिदे

वाई, दि.२३ : स्व. अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील जनतेचा हक्काचा व कामाचा माणुस हरपल्याचे दुःख आज सर्वसामान्य माणसासह राजकारणातील सर्वांना होत असुन हा दिवसही पहावयास लागेल, असे कोणासही वाटत नव्हते. मागील वर्षांपर्यंत नामदार अजितदादा पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करीत होतो. परंतु आज आपणांस त्यांची जयंती साजरी करावी लागत असल्याचे दुःख महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला होत असल्याची भावना, राष्ट्रवादी काँग्रेसचे वाई तालुका अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंत्तीनिमित्त वाई येथील बाजार समितीमधील शेतकरी सभागृहात सर्व सामान्य जनतेसाठी मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, प्रतापराव पवार, पंचायत समितीचे सभापती विक्रांत डोंगरे, वाई मार्केट कमिटीचे सभापती मोहन जाधव, वाई तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन मदन भोसले, वाई तिर्थक्षेत्र आघाडीचे अध्यक्ष संजय लोळे यांची प्रमख उपस्थिती होती.

श्री. शिंदे पुढे म्हणाले की, स्व. अजितदादा पवार यांचा राजकारणामध्ये जो दबदबा, वर्चस्व, शिस्तबद्धपणा होता तो सहसा कोणत्याही राजकारण्याकडे दिसुन येत नाही. सर्वसामान्य जनतेप्रती जो जिव्हाळा व काम करण्याच्या जिद्दीमुळेच ते सर्वच पक्षातील लोकांना हवेहवेसे वाटत होते. आजच्या दिवशी वरूण राजानेदेखील सकाळपासून हजेरी लावुन अजितदादांना अभिवादन केल्याचे दिसत असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मिरज येथील सेवासदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शेंद्रे- सातारा येथील ऑन्को लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व वाई येथील ग्रामीण रूग्णालय यांच्या संयृक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर, रक्तदान, मोफत मोतीबिंदु निदान शिबीर, नेत्र तपासणी व अल्पदरात चष्मे वाटप आयोजन करण्यात आलेले होते. शिबीराचे उदघाटन झाल्यानंतर स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आल्यावर रूग्णांच्या तपासणीस सुरूवात झाली. तद्नंतर मार्केट कमिटी व पंचायत समिती येथेही स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पुजन केल्यानंतर ग्रामीण रूग्णालातील रूग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. या शिबीरामध्ये वाई तालुक्यातील बहुतांश गावातील जनतेने उस्त्फुर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आहे. बी.पी. व शुगरची तपासणी जवळपास १५० लोकांनी केलेली असून ८० लोकांनी कॅन्सरची तपासणी तर ९५ लोकांनी आपले डोळे तपासणी करून घेऊन त्यातील २८ लोकांना विनामुल्य ऑपरेशनसाठी घेऊन जाणार आहेत. ७० लोकांनी यावेळी रक्तदान केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य बापुसाहेब शिंदे, वृषाली चव्हाण, वाई नगरपरिषदेचे नगरसेवक भारत खामकर, सनी चव्हाण, शैलेंद्र देवकुळे, शब्बीर पठाण, नगरसेविका जिविता जमदाडे, पद्मश्री चोरगे, रेखा जाधव, बाजार समितीचे संचालक रमेश गायकवाड, संजय मोहोळकर, सचिन फरांदे, संदिप जाधव, अजय नवले, दत्तात्रय खरात, उमेश जायगुडे, प्रविण कोरडे, गणेश जमदाडे, शैलेश सपकाळ, महादेव मस्कर, शशिकांत पवार, मनिष भंडारे, सत्यजित वीर, कुमार बाबर, ॲड. रविंद्र भोसले, चरण गायकवाड, आनंद चिरगुटे, रवि मांढरे, विजय भोसले, विजय चौधरी, प्रसाद कचरे, बापूराव खरात, विलास येवले, आप्पा येवले, सुनिल फणसे, दत्ता भणगे, मोअजम इनामदार, सुजितसिंह जाधवराव, आत्माराम सोनावणे, कांतीलाल पवार, राजेंद्र सोनावणे, भुईजचे उपसरपंच शुभम पवार, नितीन निकम, प्रकाश पावशे, सुधीर भोसले, नारायण नलवडे, लालु शिगटे, हिंदुराव (नाना) पिसाळ, तानाजी कचरे, प्रमोद वारागडे, यशवंत जमदाडे, अमर जमदाडे, अमोल राऊत, अक्षय निंबाळकर, युगल घाडगे, पंचायत समिती सदस्य शैलेंद्र सकपाळ, वर्षा जगताप , हर्षदा फरांदे, अमोल कदम, सुनिल सपकाळ, अभिषेक इंगळे, सुधीर गायकवाड, अमृत गोळे, विकास बाबर, रवि जाधव आदी उपस्थित होते. शिबीर यशस्वीतेसाठी वाई ग्रामीण रूग्णालय, शेद्रे-सातारा येथील ऑन्को लाईफ, मिरज येथील सेवा सदन, सातारा येथील अक्षय ब्लड बँकतील सर्व डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!