स्व. अजितदादा पवार यांच्या जयंत्तीनिमित्त विविध उपक्रम वाई येथे होणार सर्व रोग निदान शिबीर ; प्रमोद शिंदे*
वाई, दि.२० : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंत्तीनिमित्त राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांच्या उपस्थितीत वाई येथील बाजार समितीमधील शेतकरी सभागृहात बुधवार दि. २२ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी ३ वाजेपर्यत सर्वांसाठी मोफत महाआरोग्य शिबीर तसेच वाई येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये रूग्णांना फळ वाटप करण्यात येणार असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मिरज येथील सेवासदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शेंद्रे सातारा येथील ऑन्को लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व वाई येथील ग्रामीण रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर, रक्तदान, मोफत मोतीबिंदु निदान शिबीर, नेत्र तपासणी व अल्पदरात चष्मे वाटप सकाळी ८.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणार आहेत. यामध्ये संपुर्ण शरीराची तपासणी, अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत ई.सी.जी. हृदयविकार, मेंदु विकार, बायपास शस्त्रक्रिया, बी. पी., हिमोग्लोबीन, मधुमेह, एच. आय. व्ही. संसर्गजन्य आजार, टी. बी.. सिपिलीस, कावीळ, ऑन्जिओग्राफी. ऑन्जिओप्लास्टी, तोंडाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर, फुफुसाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशय मुखाची तपासणी, आतड्याचा कॅन्सर, किडणी व मुत्राशायाचा कॅन्सर, फिट, पॅरेलिसिस, डोकेदुखी, चक्कर, स्नायुंचे आजार, किडनी विकार, हर्निया, मुळव्याध, पित्तशयातील खडे, अपेंडिक्स, पोटांच्या व इतर शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणार असुन तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आजारांची मोफत तपासणी करून सर्व प्रकारचे औषधोपचार करण्यात येतील.
रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास आयोजकांच्यामार्फत आकर्षक भेटवस्तु देण्यात येणार आहे. तसेच सकाळी ११ वाजता ग्रामीण रूग्णालयातील रूग्णांना फळ वाटप होणार असुन सायंकाळी ५ वाजता किसन वीर साखर कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहितीही प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली.
या शिबीरास व इतर उपक्रमांचा लाभ वाई- खंडाळा-महाबळेश्वर तालुक्यातील जनतेने घ्यावा, असे आवाहनही, नामदार मकरंदआबा पाटील. खासदार नितीनकाका पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे. पंचायत समितीचे सभापती विक्रांत डोंगरे, वाई मार्केट कमिटीचे सभापती मोहन जाधव, वाई तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन मदन भोसले यांनी केले आहे.





















