Fri, May 29, 2026
Close

Recent Posts

शिक्षण

वाईत बन्सल क्लासेसची नवी शाखा सुरू; स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मोठी संधी

वाईत बन्सल क्लासेसची नवी शाखा सुरू; स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मोठी संधी
Ashok Ithape
  • PublishedMay 22, 2026

IIT-JEE, NEET व फाऊंडेशन कोर्सेससाठी दर्जेदार मार्गदर्शन आता वाईतच उपलब्ध

वाई l प्रतिनिधी : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे देशातील नामांकित कोचिंग संस्थांपैकी एक असलेल्या बन्सल क्लासेसची नवी शाखा वाई येथे लवकरच सुरू होत आहे.

IIT-JEE, NEET तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार शिक्षण देणारी ही संस्था आता वाई आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे.

कोटा पॅटर्नसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या बन्सल क्लासेसने अनेक विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठून दिले आहे. शिस्तबद्ध शिक्षण, अनुभवी शिक्षकवर्ग, नियमित टेस्ट सिरीज, अभ्यास साहित्य आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर विशेष लक्ष ही या संस्थेची खास वैशिष्ट्ये आहेत.

इयत्ता ७ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी फाऊंडेशन कोर्सेससह JEE आणि NEET साठी सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि विशेष सवलतींच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

वाई शहरात सुरू होणाऱ्या या शाखेमुळे ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात न जाता गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन मिळणार असून, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रवेश प्रक्रिया आणि नव्या बॅचेसची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!