Fri, Apr 17, 2026
महिला विशेष

वीरनारी शेतकरी उत्पादन कंपनीला भारतीय सेनेचे बहुमूल्य योगदान

वीरनारी शेतकरी उत्पादन कंपनीला भारतीय सेनेचे बहुमूल्य योगदान
Ashok Ithape
  • PublishedApril 13, 2024

सातारा दि.10 (जिमाका) :

देशातील सर्वप्रथम पहिली वीरनारींची फार्मर प्रोड्यूसर कंपनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी स्थापन झाली. या वीरनारींच्या कंपनीला मदत होण्याच्या दृष्टीने 269 इंजिनिअर युनिटने मौजे धोंडेवाडी तालुका खटाव येथे 1 कोटी 90 लाख लिटर पाण्याच्या साठयासाठी  तीन शेततळी तयार करण्याचे उद्दिष्ट आहे, तसेच शेततळ्यापर्यंत पाईप लाईन करून देणे, झाडे लागवडीकरिता खड्डे व इतर कामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत.  या कामासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मेजर आनंद पाथरकर, सेना मेडल (निवृत्त) व जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे-पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या कामामध्ये 269 इंजीनियर रेजिमेंटचे मेजर राहुल मलिक यांच्या मार्गदर्शन खाली शेततळ्याचे व इतर कामे होणार आहेत.

वीरनारी फार्मा प्रोड्यूसर कंपनीचे मुख्य उद्दिष्टे, शेतजमिनीचा विकास आणि व्यवस्थापन करणे, तीन हेक्टरवर केशरी आंबा, एक हेक्टरवर पेरू लागवड करणे, धोंडेवाडी येथे व्यवसाय केंद्राची स्थापना करणे, ज्यामध्ये कंपनीनंतरच्या सुविधा जसे की पॅक हाऊस, क्लिनिंग आणि ग्रेडिंग युनिट, कोल्ड स्टोरेज आणि ट्रेड सेंटर, शेतकरी गटांमध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आणि जमिनीचे सेंद्रिय प्रमाणीकरण सुलभ करणे,  किमान 1000 महिला भागधारकांची नोंदणी करून माजी सैन्य कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि व्यापार आणि व्यवसाय विकास सुलभ करण्यासाठी इतर शेतकऱ्यांसाठी शेतजमिनीचा विकास करणे असा आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!