Tue, Apr 21, 2026
सातारा जिल्हा

जनसामान्यांचा नेता स्व. लक्ष्मणराव पाटील – हरिष पाटणे

जनसामान्यांचा नेता स्व. लक्ष्मणराव पाटील – हरिष पाटणे
Ashok Ithape
  • PublishedJanuary 21, 2024

वाई दि २० :- बोपेगाव येथे रामराव पाटील विद्यालयात सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी खासदार कै लक्ष्मणराव पाटील यांची पुण्यतिथी पार पडली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात पुणे विभागीय अधिस्वीकृती शासकीय समितीचे अध्यक्ष व दै‌. पुढारीचे प्रमुख मा. हरिषजी पाटणे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चे सरचिटणीस प्रतापराव पवार होते.

स्व. लक्ष्मणराव पाटील हे जनसामान्यांचे नेते होते सामान्य लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम पणे ऊभे रहाणारे नेते म्हणून लक्ष्मणराव पाटील राज्यभर परिचित होते हे सांगताना हरीश पाटणे यांनी तात्यांच्या जिवनातील अनेक पैलू उघड केले बोपेगाव सारख्या ग़ामिण भागातुन पुढे येऊन खरेदी विक्री संघ पंचायत समिती जिल्हा परिषद खासदार अशी अनेक पदे भुषवली‌. आमदार होता नाही आले पण ते स्वप्न मकरंद आबांच्या रूपाने पुर्ण केले‌ मकरंद आबा प्रथम आमदार म्हणून निवडून आले तेव्हा तात्यांच्या डोळ्यातील अश्रू मी पाहिले आहेत.

पवारसाहेबांवर एका माथेफिरूने हमाला केला तेव्हा जिल्ह्यातील कार्यकर्त्याच्या भावनेचा उद्रेक झाला होता तेव्हा कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले, त्यामध्ये काही कार्यकर्त्यांना अटक झाली त्यांना सोडविण्यासाठी तात्या थेट पोलिस ठाण्यात हजर होते‌. तात्यांचे नेतृत्व आम्ही अगदी जवळून पाहिले आहे. त्यामुळे तात्यांच्या खिलाडु वृत्तीला आम्हीही खिलाडुपणे उत्तर देत असु पण तात्यांनी कधीही त्या गोष्टीचा राग धरला नाही. अशा भावना हरिष पाटणे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

कार्यक्रमास किसनवीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, महादेव मस्कर, शशिकांत पवार, मनोज पवार, मनिष भंडारी, आत्माराम सोनावणे, सत्यजित वीर, दत्ता मर्ढेकर, विश्वास पवार, भद्रेशजी भाटे,अशोक इथापे, आदि मान्यवर उपस्थित होते,
सुरवातीला प्रतापराव पवार यांनी मनोगत व्यक्त केले प्रस्तावना व सुत्र संचालन विठ्ठल शिंदे यांनी केले जांभळे सर यानी आभार मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!