Mon, Mar 2, 2026
सहकार सातारा जिल्हा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अमृत महोत्सव सांगता समारंभ मुख्यमंत्री मा. ना.श्री.एकनाथजी शिंदे यांचे उपस्थितीत संपन्न होणार !

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अमृत महोत्सव सांगता समारंभ मुख्यमंत्री मा. ना.श्री.एकनाथजी शिंदे यांचे उपस्थितीत संपन्न होणार !
Ashok Ithape
  • PublishedSeptember 30, 2024

सातारा : जिल्हयातील सहकारी संस्थांची मातृसंस्था, आपल्या उत्तम प्रशासन, उत्कृष्ठ कार्यपध्दती व सुयोग्य नियोजनामुळे राज्यातच नव्हेतर देशातील सहकार क्षेत्रात सातारा जिल्हा बँक अग्रेसर आहे . बॅंकेवरील ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्यामुळे बँक आपला अमृत महोत्सव समारंभ अत्यंत उत्साहाने साजरा होत आहे. यानिमित्ताने गेली वर्षभर बँकेने शेतकरी, सभासद, ग्राहक यांच्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम बँकेने राबविले आहेत.
आजवर १०० पेक्षा अधिक विविध पुरस्कारांनी गौरवलेली ,गुणवत्ता व आधुनिक बँकिंगद्वारे ग्राहकाभिमूख सेवा यामुळे, आय. एस.ओ. ९००१:२०१५ मानांकन प्राप्त असलेल्या आपल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा भव्य सांगता समारंभ बुधवार दि.२ ऑक्टोबर २०२४ रोजी, दुपारी १२..०० वा. सैनिक स्कूल मैदान,सातारा येथे संपन्न होत आहे.

या विशेष प्रसंगी, मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, मा.ना.अजितदादा पवार, सहकार मंत्री मा.ना.दिलीप वळसे-पाटील, उत्पादनशुल्क तथा पालकमंत्री, सातारा मा.ना.शंभूराज देसाई ,विधानपरिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , माजी सहकार मंत्री आ.शामराव तथा बाळासाहेब पाटील ,महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष मा.श्री.विद्याधर अनास्कर, मा. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ,मा आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा. आमदार मकरंद आबा पाटील व इतर मान्यवर उपस्थित रहाणार आहेत .

या कार्यक्रमास बँकेचे सर्व खातेदार सभासद ,हितचिंतक आणि जिल्ह्यातील बँकेवर प्रेम करणारे सर्व नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मा.खा.श्री.नितीन लक्ष्मणराव पाटील उपाध्यक्ष मा.श्री. अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र सरकाळे व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!