झवेरी सेठना यांच्याकडून वाई तालुक्यातील पश्चिम भागातील शालेय विद्यार्थ्यांना दातृत्वाची तपपुर्ती.
वाई l प्रतिनिधी:
पाचगणी येथील प्रसिद्ध व्यावसायिक झवेरी सेठना व परिवार यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परतवडी, कोंढवली, नांदगणे, पार्टेवाडी व माडगणी येथील विद्यार्थ्यांना पूर्ण शैक्षणिक वर्षात लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची भरघोस मदत केली जाते हा कार्यक्रम नुकताच जिल्हा परिषद शाळा परतवडी या ठिकाणी पार पडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कृष्णदेव मोहिते यांनी केले उपस्थितांचे स्वागत कोंढवली शाळेचे मुख्याध्यापक रमेश जाधव , नांदगणे शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण उदार व पार्टे वाडी शाळेचे मुख्याध्यापक रामदास मोरे तसेच छाया फरांदे, लतिका कासुर्डे, विनिता जरंडे व शांताराम शिर्के, मेहरसर यांनी केले
या चारही शाळेतील विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी सुमारे सातशे रुपये चे शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
याप्रसंगी जुनोबिया सेठ ना मॅडम व झवेरी सेठना यांनी सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या व जीवनात आपली शैक्षणिक उंची वाढवण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक कृष्णदेव मोहिते यांनी आजच्या कार्यक्रमाचा हेतू व दातृत्वाविषयी सविस्तर सांगितले.
याप्रसंगी मुख्याध्यापक रमेश जाधव बोलताना म्हणाले की आपल्या दातृत्वामुळे या पश्चिम भागातील गरीब शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणामध्ये सेठना परिवाराचा मोठा वाटा आहे यामुळेच या चारही शाळेतील विद्यार्थी गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेऊन पुढील शिक्षणाची गुणवत्ता सिद्ध करत आहेत.
या पाठीमागे दातृत्वाची प्रेरणा आहे तसेच विविध सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत आहे. तसेच या कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक रामदास मोरे यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम आकार घेत आहे असे सांगितले
याप्रसंगी सौ लतिका कासुर्डे, प्रवीण उदार, रामदास मोरे यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
कार्यक्रमास परतवडीचे सरपंच तुकाराम जाधव ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच प्रकाश जाधव ,माजी सरपंचराजेंद्र चोरट , सहदेव जाधव कृष्णदेव कळंबे ,गायत्री चोरट, प्रतीक्षा चोरट,पूजा जाधव , ताराबाई जाधव , संदीप चोरट अंगणवाडी सेविका शशिकला जाधव ,आनंदा सपकाळ, तुकाराम सपकाळ, विजय सपकाळ ,किसन सपकाळ
इत्यादी शिक्षण प्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार कोंढवली शाळेच्या जेष्ठ शिक्षिका सौ छाया फरांदे यांनी मानले व सूत्र संचलन विनिता जरंडे यांनी केले













