Fri, Apr 17, 2026
अध्यात्म

संवाद वारी उपक्रमातून शासकीय योजनांची चांगली माहिती मिळाली

संवाद वारी उपक्रमातून शासकीय योजनांची चांगली माहिती मिळाली
Ashok Ithape
  • PublishedJuly 8, 2024
आम्ही आमच्या गावी जाऊन या योजनांचा लाभ घेऊ अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केला विश्वास.
संवाद वारी उपक्रमास वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा दि. ७ (जि.मा.का.)- संवाद वारी उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या अनेक योजनांची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या गावी गेल्यानंतर या योजनांचा नक्की लाभ घेऊ अशा भावना अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केल्या. लोणंद, ता. खंडाळा येथे आयोजित संवाद वारी उपक्रमास भेट दिल्यानंतर वारकऱ्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
तसेच या उपक्रमामुळे अनेक योजनांची माहिती मिळाली असून शासन राबवत असलेल्या कल्याणकारी योजनांसाठी शासनाचे आभार व्यक्त केले.
परभणी येथील गजानन शिंदे म्हणाले, आमचे कुटुंब शेतकरी कुटुंब असून आमच्यासाठी शासन चांगल्या योजना राबवत आहे. काही योजनांचा लाभ घेतला आहे. पण आता आम्हाला आणखी ही योजनांची माहिती मिळाली आहे. गावी गेल्यानंतर ग्राम पंचायतीच्या माध्यमातून या योजनांची माहिती घेऊ व त्याचा कसा लाभ घेता येईल हे पाहू.
अशाच भावना इतर अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केल्या. शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारा संवाद वारी हा उपक्रम प्रदर्शन, पथनाट्य, लोककला आणि चित्ररथ या माध्यमातून माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने राबवण्यात येत आहे. लोणंद येथे हजारो वारकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट दिली तसेच पथनाट्य, चित्ररथ माध्यमातूनही योजनांची माहिती जाणून घेतली.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!