गुजरातच्या पलपब पब्लिकेशने केला महाराष्ट्राच्या सुपुत्राचा सन्मान…
![]()
श्री विजय कदम यांना महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्कार प्रदान.
चिंधवली l दिपक पवार :
या कृष्णेच्या पाण्यात नक्की आहे तरी काय, तिच्या सहवासात राहणाऱ्या, वावरणाऱ्या या सातारच्या माणसांचा ठसा नेहमीच कर्तबगारीतून वेगळाच, अगदी खाणीतल्या रत्नांसारखी, कारण ती व्यक्तिमत्त्व सामाजिक बांधिलकीत ती कायमच टप्प्या टप्प्यावर चमकणार आणि सर्वदूर आपली प्रेरणा देण्याचे काम करणार आणि त्याच धर्तीवर गुजरात अहमदाबाद येथील पलबम पब्लिकेशनने जाणलं, ओळखलं आणि निवडलं सुद्धा..
पलपब पब्लिकेशन अहमदाबाद ( गुजरात ) यांनी कृष्णा-कोयना मायभूमीत यशवंतनगरी कराड येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आणि राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन २६ मे रोजी केले होते. यामध्ये ग्रंथ दिंडी, पुस्तक प्रकाशन सोहळा, पुरस्कार सोहळा आणि राज्यस्तरीय कवी संमेलन असे कार्यक्रम पार पडले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा.डॉ. ज्ञानेश्वर मुळे (सदस्य, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, माजी राजदूत), मुख्य अतिथी कवी व गीतकार हनुमंत चांदगुडे, तसेच विशेष अतिथी जेष्ठ लेखक डॉ.विनायकराव जाधव आणि रेखा दीक्षित या मान्यवरांचा सहभाग होता, कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय विशेष पुरस्कार, महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार आणि साहित्य भूषण पुरस्काराने राज्यातील विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये सातारच्या मातीतले अपशिंगे गावचे सध्या रहिमतपूर येथे वास्तव्यास असणारे श्री विजय कदम यांस त्यांच्या शासकीय सेवा, शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक आणि माऊली करिअर ॲकॅडमी, रहिमतपूर अंतर्गत पोलिस आणि आर्मी भरती करणाऱ्या अनाथ मुलांना मोफत शिक्षण देण्याच्या कार्याबद्दल त्यांचा “महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्कार २०२४” देऊन गौरव करण्यात आला.
आई वडील दोघेही मॅट्रिक पेक्षा कमी शिकलेले असतानाही कष्टाच्या परिस्थितीत आपल्या मुलाला शैक्षणिक वाटचाली बरोबर उंच भरारी घेण्याचे बळ नेहमी देत राहिले, याचे या सन्मानाने सार्थक झाले. या यशामागे आई, वडील, पत्नी, भाऊ आणि मित्र परिवाराचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले आणि इथूनही पुढे आणखी सामाजिक बांधिलकीसाठी कायमच कटिबद्ध असल्याचे सांगितले.













