Mon, Mar 2, 2026
साहित्य

लोकमान्य टिळक स्मारक संस्था आयोजित १०८ व्या वसंत व्याख्यानमालेच्या चतुर्थ पुष्पात विचार नेटका नेमका या विषयावर प्रसिद्ध लेखक व उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांचे मार्गदर्शन

लोकमान्य टिळक स्मारक संस्था आयोजित १०८ व्या वसंत व्याख्यानमालेच्या चतुर्थ पुष्पात विचार नेटका नेमका या विषयावर प्रसिद्ध लेखक व उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांचे मार्गदर्शन
Ashok Ithape
  • PublishedMay 6, 2024

वाईl प्रतिनिधी : दि. 5

सातारा आणि विशेषत्वाने वाई ही विचारवंतांची भूमी आहे. बुद्धीप्रामाण्यवाद सांगणाऱ्या आगरकरांच्या भूमीतूनच आपण येतो. पण आजच्या वैचारिक दारिद्र्यामुळे महाराष्ट्रात कर्मदारिद्र्य निर्माण झाले आहे.

आपल्याला अगदी सहज महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा प्राप्त झाला म्हणूनच त्याचे महत्त्व आपल्याला समजत नाही या वारसाचे जतन करून तो पुढे चालवायचा असेल तर नेमक्या आणि नेटका विचार करता यायला हवा. असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांनी आपल्या व्याख्यानातून केले.

लोकमान्य टिळक स्मारक संस्था आयोजित १०८ व्या वसंत व्याख्यानमालेच्या चतुर्थ पुष्पात विचार नेटका नेमका या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त श्री अनिल जोशी यांनी अध्यक्षपद भूषवले प्रफुल्ल वानखेडे पुढे म्हणाले परंपरांचा आणि लोक मताचा गुलाम व्हायचं नसेल तर स्वतःचा विचार असणे गरजेचे आहे.

आज जंगली रमी पैसे गुंतवणुकीच्या फसव्या योजना यात अनेक लोक अडकतात जगात खोटं विकले जाण्याचे एकमेव कारण म्हणजे लोकांना विचार करण्याची योग्य पद्धत अवगत नसणार अति विचारामुळे तानावात डिप्रेशनमध्ये जाणाऱ्या नव्या पिढीकडे पाहिले की वाटतं नेमका आणि नेमका विचार का करता येऊ नये क्रिटिकल डिस्ट्रक्टिव्ह ऍनालिटिकल हे विचार आणि असे अनेक प्रकार विचार करण्याचे आहेत ते आपण साध्य करायला हवेत विचारामुळे दूरदृष्टी येते विचार बदलण्याची क्षमता आपल्याकडे हवी भीती ताण देणाऱ्या विचारांचा वापर यश प्राप्तीसाठी करून घ्यावा शारीरिक बौद्धिक भावनिक व अध्यात्मिक हे चार वयाचे प्रकार आहेत त्यातील तीन प्रकारचे वय माणसाच्या विचारांवर ठरते सद विचाराचा माणसाला शाश्वत यशाकडे घेऊन जातात या यशाचा दुसरा शॉर्टकट नाही नेमक्या आणि नेटक्या विचारांचे महत्त्व प्रफुल वानखेडे यांनी शब्दबद्ध केले या विषयावर विचार करताना मला वैचारिक श्रीमंती लाभली, असे शेवटी म्हणाले.

विश्वस्त श्री अनिल जोशी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. ग्रंथपाल श्री अमित वाडकर यांनी प्रास्ताविक केले तसेच प्रा. बिपीन वैराट यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला, आणि शेवटी रोहिणी बगाडे यांनी आभार मानले.
डॉ. नितीन कदम (दिशा अँकॅडमी) व डॉ. मनोहर दातार (जनरल हॉस्पिटल) यांनी या व्याख्यानाचे प्रायोजकत्व स्वीकारले होते.व्याख्यानासाठी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!