Mon, Mar 2, 2026
स्थानिक बातम्या

धोम धरणाखालील नवा पूल वाहतुकीसाठी सज्ज..

धोम धरणाखालील नवा पूल वाहतुकीसाठी सज्ज..
Ashok Ithape
  • PublishedMarch 27, 2024

वाईच्या पश्चिम भागाच्या वैभवात भर…जोर जांभळी खोऱ्यातील नागरिकांना व पर्यटकांना येण्या – जाण्यासाठी अंतर वेळ व इंधनाचा खर्च वाचणार,

पश्चिम भागात पर्यटकांची संख्या वाढणार ..पूल ठरतोय सेल्फी पॉईंट

वाई l प्रतिनिधी : धोम धरणाच्या खाली व्याहळी ते धोमला जाणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रावरील नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून या पुलामुळे पश्चिम भागाच्या वैभवात भर पडली आहे व जोर व जांभळी खोऱ्यातील नागरिकांना व पर्यटकांना वाईहून येण्या-जाण्यासाठी लागणारे अंतर वेळ इंधनाचा खर्च याची बचत होणार आहे या भागात धोम बलकवडी धरणे त्यांची जलाशय नौका विहार सह्याद्री पर्वतांचे निसर्ग सौंदर्य धोम येथील पुरातन देवदेवतांची मंदिरे गायमुख पाहण्यासाठी धार्मिक व पर्यटकांची वाढ होऊन स्थानिक बेरोजगार युवक नागरिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

महाबळेश्वर मध्ये उगम पावलेल्या कृष्णा नदीवर प्रथम धोम व नंतर बलकवडी येथे धरणे बांधण्यात आली या धरणामुळे राज्यातील हजारो एकर जमीन जमीन ओलिताखाली आली व दुष्काळी भागालाही पाणी मिळाले मात्र येथील भूमिपुत्रांना विस्थापित व्हावे लागले त्यांनी राष्ट्र हितासाठी त्याग केला येथील दोन्ही भागातील या पुलाची मागणी गेली कित्येक वर्षांपासून होती कारण पावसाळ्यात तसेच कधीही पलीकडे जायचे म्हटले की वाई शहरातून जाण्याशिवाय पर्याय नव्हता जवळ जवळ १६ किमी अंतर अधिक प्रवास त्यासाठी वेळ इंधन नाहक खर्ची पडत होता.

या नवीन पुलामुळे तो वाचणार आहे त्यामुळे येथील जनतेत समाधानाचे वातावरण व्यक्त होत आहे आणि पर्यटकांची संख्या वाढून स्थानिक युवक नागरिक याना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत व्याहली ते धोम या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला असून लवकरच हा रस्ताही पूर्ण होईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

धोम धरणाखाली नवीन झालेल्या पुलासाठी ८.५० कोटी निधी खर्च झाला असून तो पूर्णत्वास गेला आहे पुलाची लांबी ९३ .९४ मीटर असून १६.४७७ चे दोन गाळे व १५.४७७ चे चार गाळे पुलाची रुंदी १० मीटर आर सी सी आर्च पद्धतीच्या उंच पुलाच्या दोन्ही बाजूला ५० मीटर लांबीचे पोहच रस्ते डांबरीकरण करून तयार करण्यात आले आहेत धोम धरणातून पावसाळ्यात नदी पात्रात पाणी सोडल्यावर ही पुलावरून प्रवास करता येणार असून स्थानिक व पर्यटकांसाठी मोठे आकर्षण व सेल्फी पॉईंट ठरणार आहे.

प्रतिक्रिया – या पुलामुळे जोर जांभळी दोन्ही खोऱ्यातील शेतकऱ्यांना शेती मालाची ऊस वाहतूक करण्याचा व स्थानिक नागरिक पर्यटक याना प्रवासासाठीजवळचा मार्ग उपलब्ध झाला आहे यामुळे अंतर वेळ इंधन याची बचत होईल – महेश गोंजारी – उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाई

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!