Mon, Mar 2, 2026
स्थानिक बातम्या

आध्यात्म्या आणि विज्ञान एकत्र आल्यास नैराश्यवर विजय मिळवण्याचे सामर्थ्य

आध्यात्म्या आणि विज्ञान एकत्र आल्यास नैराश्यवर विजय मिळवण्याचे सामर्थ्य
Ashok Ithape
  • PublishedMarch 27, 2024

भुईंज दि. 27

आध्यात्म्या आणि विज्ञान एकत्र आल्यास नैराश्यवर विजय मिळवण्याचे सामर्थ्य मिळू शकते हे नुकतेच विविध पारायण सोहळयातून आपण सर्वांनी अनुभवले आहे. संत आणि महंत यांची विचारधारा जपणारे आपले संस्कार हेच आध्यात्म्याच्या शिकवणीतून नव्या पिढीला घडवूया असे प्रतिपादन तिरंगा इजुकेशन सोसायटीचे मार्गदर्शक सचिव पै. जयवंत पवार यांनी केले.

खड़की तालुका वाई येथे तुकाराम बीज निमित्त आयोजित ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे शुभारंभ प्रसंगी पै. जयवंत पवार बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जेष्ट पत्रकार व भुईज प्रेस क्लबचे संस्थापक जयवंत पिसाळ होते.

यावेळी बोलताना पै. जयवंत पवार पुढे म्हणाले की, गावाचे गावपण आणि मानुसपण टिकवण्याचे ताकद फक्त संतांच्या विचारधारेत असून तो एकत्र आल्यास खऱ्या अर्थाने उत्सव सोहळे होतात. हेच सामुदायिक पारायनातून जपले जाते. याचा खडकी गावाने केलेला जागर म्हणजेच आध्यात्म होय असे. सांगून त्यांनी यशस्वी करणाऱ्या संत आणि महंत यांची विचारधारा जपणारे आपले संस्कार हेच आध्यात्म्याच्या शिकवणीतून नव्या पिढीला घडवूया असे सांगितले.

प्रारंभी मान्यवरांचे स्वागत खडकी ग्रामस्थाच्या वतीने ह.भ.प. अरविंदबुवा शिंगटे यांनी केले. यावेळी उपसरपंच प्रसाद शिंगटे, संभाजीराव शिंगटे, नंदकुमार शिंगटे, संदीप सुर्वे आर्दीनी सत्कार केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!