Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा सामाजिक

भविष्यात धनवडेवाडी राज्यातील आदर्श गाव ठरेल – डॉ. जयदीप चव्हाण

भविष्यात धनवडेवाडी राज्यातील आदर्श गाव ठरेल – डॉ. जयदीप चव्हाण
Ashok Ithape
  • PublishedMarch 2, 2024

रयतसेवक प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांची तृतिय जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी – धनवडेवाडीत मोफत सर्वरोग तपासणी व औषधोपचार शिबिर उत्साहात

भुईंज: महेंद्रआबा जाधवराव

भाटमरळीचे सुपुत्र, माजी जि. प. सदस्य व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ज्येष्ठ समर्थक रयतसेवक प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांची तृतिय जयंती दि. १ मार्च रोजी विविध सामाजिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

शिवविजय प्रतिष्ठान भाटमरळी आणि श्री मंगलमूर्ती हॉस्पिटल सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांच्या तृतिय जयंतीनिमित्त धनवडेवाडी ता. सातारा येथे मोफत सर्वरोग तपासणी व औषधोपचार शिबीराचे आयोजन केले होते. याप्रसंगी श्री मंगलमूर्ती हॉस्पिटलचे डॉ. जयदीप चव्हाण बोलत होते. याप्रसंगी प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांच्या पत्नी श्रीमती विजयादेवी चव्हाण, पत्रकार केशवराव चव्हाण, सयाजी चव्हाण, बांधकाम व्यावसायिक अभिजित चव्हाण, सरपंच भरत पवार, उपसरपंच दिलिप पवार, माजी सरपंच गोपीनाथ पवार, पोलीस पाटील सोमनाथ बर्गे, परशुरामआबा पवार, साईनाथ पवार, हभप. राजेंद्र पवार आदींसह सदस्य तसेच धनवडेवाडी व भाटमरळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरात प्रारंभी श्रीमती विजयादेवी चव्हाण यांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन प्रसंगी धनवडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात डॉ. जयदीप चव्हाण म्हणाले, वारकरी संप्रदायाचा पुरस्कार करणारे धनवडेवाडी गावाचा एकोपा आदर्शवत असा आहे. भविष्यात धनवडेवाडी राज्यातील आदर्श गाव ठरेल असे सांगितले.

कार्यक्रमात सयाजी चव्हाण आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी स्व. प्रा.डॉ. शिवाजीराव चव्हाण यांच्या स्मृतिपित्यर्थ सभा मंडपासाठी 75 हजारांची देणगी दिली तसेच श्री ज्ञानेश्वरी पारायण मंडळास 50 श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप केले. सायंकाळपर्यंत शिबिरामध्ये शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे वाटप करण्यात आली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!