Mon, Mar 2, 2026
पर्यावरण स्थानिक बातम्या

वाई पंचायत समितीच्या भरारी पथकाकडून प्लास्टिक वापर करणाऱ्या व कचरा उघड्यावर फेकणाऱ्या व्यक्तींवर धडक कारवाई

वाई पंचायत समितीच्या भरारी पथकाकडून प्लास्टिक वापर करणाऱ्या व कचरा उघड्यावर फेकणाऱ्या व्यक्तींवर धडक कारवाई
Ashok Ithape
  • PublishedFebruary 27, 2024

जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा कार्यक्षेत्रामध्ये नागरिकांकडून प्लास्टिक वापर सर्रास केला जात असल्याने जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य  टिकवण्यासाठी गाव व तालुका स्तरावरील पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिल्या होत्या या पार्श्वभूमिवार आज वाई पंचायत समिती मार्फत धड़क करवाई सुरु करण्यात अली आहे.

वाई l प्रतिनिधी :

ग्रामपंचायत विरमाडे ता.वाई येथे आनेवाडी टोल नाका राष्ट्रीय महामार्ग जवळील व्यावसायिक व दुकानदार यांच्यावर पाणी व स्वच्छता विभाग पंचायत समिती वाई अंतर्गत 12 व्यावसायिक व दुकानदार यांनी सार्वजनिक रस्त्याच्या कडेला व उघड्यावर प्लास्टिक व घनकचरा कचरा टाकल्याबद्दल कारवाई करण्यात आली.

पंचायत समितीचे सहा. गटविकास अधिकारी कुचेवार, विस्तार अधिकारी (पंचायत ) रुपेश मोरे  व राहुल हजारे यांच्या मार्गदर्शना खाली स्थापन केलेल्या तालुका स्तरीय पथका मार्फत संबंधित व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे तालुका सल्लगार रोहित जाधव, घनकचरा व्यवस्थापन अभियंता अक्षय शिंदे, स्वाती कचरे सरपंच ग्रामपंचायत विरमाडे, उपसरपंच जयवंत सोनावणे, तुषार सोनावणे व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक रघुनाथ भोईर, आणि पथक सदस्य उपस्थित होते.

भरारी पथका मार्फत उघड्यावर कचरा टाकणाऱ्या दुकानदार यांना नोटीस देण्यात आले. यापुठे प्रशासना मार्फत कडक कारवाही करण्यात येणार असलेबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी सर्व व्यवसायिक व दुकानदार यांनी सकारात्मक भूमिका घेत सार्वजनिक स्वच्छतेकरिता कटिबद्ध राहून स्वच्छतेचे सर्व नियमांचे पालन करण्यात येईल असा प्रतिसाद दिला.

महाराष्ट्र शासनाचा स्वच्छ भारत मिशन उपक्रम जिल्ह्यामध्ये सर्व नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत आहे . जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी माननीय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीसाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई , जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी , मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अर्चना वाघमळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता क्रांती बोराटे सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
स्वच्छता विभागाची बैठक 4 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली होती या अनुषंगाने एक महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये स्वच्छता सातत्य राखण्यासाठी गाव स्तरावर  1148 पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून 468  प्लास्टिक विक्रेते  दुकानदार व उघडा वरती कचरा फेकणारी व्यक्ती यांच्यावर कारवाई करून 62,502 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच 7586 विक्रेते व लोकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. गाव स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत  1332 गावांमध्ये प्लास्टिक संकलन केंद्र उभारण्यात आलेले आहेत.
तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी 298 ग्रामपंचायत यांनी महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत.
जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी गावांमध्ये उघड्यावरती कचरा फेकणाऱ्या लोकांची नावे पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत व त्या व्यक्तींच्याकडून दंड वसूल करणे यावा पुढील एक महिन्याच्या कालावधीमध्ये ही मोहीम अधिक कडक करण्यात यावी.
तसेच तालुका व जिल्हा स्तरावरील भरारी पथकांनी अचानक भेटी देऊन जिल्ह्यातील मोठ्या पंचायती, बाजाराची गावे,पर्यटन स्थळे  यामध्ये  कडक कारवाई कराव्यात प्रत्येक गावातील रस्ते, चौक, गाव परिसर कचरामुक्त करण्यासाठी मोहीम स्वरूपात उपक्रम हाती घेण्यात यावा. या कामासाठी जिल्ह्यातील  पोलिसांनी सहकार्य करावे.
सातारा जिल्ह्यातून कचरा ही समस्या कायमस्वरूपी घालवण्यासाठी गावपातळीवर जनजागृतीचे उपक्रम करून लोकांची मानसिकता बदलण्याचे काम पथकांनी करावे अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!