३५० व्या राजाभिषेक सोहळ्यानिमित्त राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्टने तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर मूर्तीचे अनावरण मा.युवराज मालोजीराजे छत्रपती (कोल्हापूर) यांच्या हस्ते संपन्न
भुईंज: महेंद्रआबा जाधवराव
राजमाता जिजाऊं माँसाहेबांच्या माहेरील वंशंजांकडून जवळपास ३ वर्ष शास्त्रशुद्ध आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रत्येक बारकावे लक्षात घेऊन आणि माहिती मिळवून ३५० व्या राजाभिषेकचे वर्ष कारणाने शिवजंयतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी रोजी मूर्तीचे अनावरण करण्यात आले असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष श्री.अभयसिंह जाधवराव यांनी सांगितले.
१६७४ साली रायगडावर झालेल्या वैभवशाली आणि मंगलमय शिवराजाभिषेकाचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभलेल्या इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्सिडन याने राजभिषेक सोहळ्याचे सविस्तर वर्णन लिहून ठेवलेले आहे,शिवाजी महाराजांची तेजस्वी मुद्रा,तीक्ष्ण दृष्टी त्यांचे नाक,दाढी,मिशा तसेच अंगावरील पोशाख आणि सिंहासन तसेच त्यावरील अधिकार निदर्शक आणि राजसत्तेची द्योतक चिन्हे आदी सगळ्या गोष्टींचा हुबेहूब वापर करून सदर मूर्ती तयार केल्याचे ट्रस्टचे विश्वस्त श्री.दुष्यंत जाधव यांनी सांगितले.

जवळपास दीड वर्षांपासून प्रचंड मेहनत घेऊन शास्त्रशुद्ध आणि अभ्यासपूर्ण माहिती घेतलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ,सिंहासन तसेच सिंहासनाच्या दोन्ही बाजूस सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर असलेली निदर्शक चिन्हे,उजव्या हाताला मोठ्या दातांच्या मास्यांची शिरे आणि डाव्या हातास असलेले अश्वपूछे आणि न्यायचिन्ह म्हणून सोन्याच्या तराजूची पार्डी तयार करण्याचे काम प्रसिद्ध मूर्तिकार श्री राम माळी आणि शाम माळी या बंधूना देण्यात आल्याचे ट्रस्टचे प्रमुख सल्लागार श्री. समीरसिंह जाधवराव यांनी सांगितले .
सदर मूर्ती चे मूर्तिकाम करतांना शिवनेरी ,पुरंदर ,राजगड ,प्रतापगड आणि रायगड वरून आणलेल्या पवित्र माती आणि पाण्याचा वापर केलाअसून ही मूर्ती पुण्यातील समस्त शिवप्रेमींना कायमच प्रेरणा देईल असे ट्रस्टचे खजिनदार श्री.निलेश जाधव यांनी सांगितले.













