Tue, Mar 3, 2026
सातारा जिल्हा

आनेवाडीसह चार गावांना सुसज्ज स्मशानभूमीसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचेकडून १६ लाखाचा निधी

आनेवाडीसह चार गावांना सुसज्ज स्मशानभूमीसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचेकडून १६ लाखाचा निधी
Ashok Ithape
  • PublishedFebruary 25, 2024

पत्रकार : महेंद्रआबा जाधवराव :

अनेक वर्षांपासून या गावाचा प्रलंबित असणारा हा स्मशानभूमीचा महत्वाचा प्रश्न सुटणार आहे. यासाठी आणखी जास्तीतजास्त मदत कशी करता येईल, यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. – आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

गेली अनेक वर्षे स्मशानभूमी अभावी अंत्यविधी करताना मोठ्या अडचणींचा सामना करणा-या आनेवाडी, रायगाव, महामुलकरवाडी, मालुसरेवाडी गावच्या ग्रामस्थांसाठी आता सुसज्ज सर्व सोयीयुक्त स्मशानभूमी उभी राहणार असल्याने मरणानंतर देखील मृतदेहाची होणारी गैरसोय आता थांबणार आहे.

जावळी तालुक्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या आनेवाडीसह इतर चार गावांसाठी मर्ढे येथील कृष्णा नदीतीरावर अंत्यविधी करण्यासाठी यावे लागत असे व येथे उघड्यावरच सर्व विधी करावे लागत असायचे, पावसाळ्यात तर खूपच मोठी गैरसोय व्हायची, नदीला पूर आत्याने तर पेटवलेली चिता देखील वाहून जाण्याचे प्रकार येथे घडले होते, त्यामुळे इतर विधी देखील होताना मोठी अडचण असायची, या सर्व अडचणी पाहता आनेवाडी गावचे सरपंच (कै.) शिवाजी गोरे व यशवंत फरांदे व त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नातून गावातीलच (कै.) लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांचे सुपुत्र शाहीर वैभव फरांदे व त्यांच्या कुटुंबीयांनी पाच गुंठे जागा स्मशानभूमीसाठी विनामोबदला देऊ केली व रीतसर गावच्या नावावर देखील करून दिली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यासाठी तब्बल सोळा लाखाचा निधी आमदार फंडातून उपलब्ध करून दिला. आजपर्यंत अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीच नसल्याने अंत्यविधी करताना मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. मात्र, आता या ठिकाणी सुसज्ज अशी सर्व सोयीयुक्त स्मशानभूमी उभी राहत आहे. अंत्यविधीसाठी गावातून
असत्याने पाच वर्षांपूर्वी प्रसिद्ध सिनेनिर्माते व रायगावचे सुपुत्र (कै.) मधुअण्णा देशपांडे यांनी परिसरातील गावांसाठी कृष्णा नदीतीरावर येण्यासाठी ३० ते ३५ लोक बसतील, अशी शववाहिनी मोफत दिली आहे. तर या ठिकाणी आणखी सुविधा करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी लोकवर्गणी काढली आहे.

गैरसोय थांबणार; लोकशाहीर पुंडलिक फरांदेंच्या कुटुंबाचे दातृत्व-
आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून आम्ही अ अशा प्रकारे स्मशानभूमीसाठी जागा देऊन सेवेस उतरलो, त्याबद्दल आम्ही आमचे भाग्य समजतो. आणखी जे काही करतायेईल ते आम्ही करतच राहू, – शाहीर वैभव फरांदे, आनेवाडी

लोकशाहिरांचे नाव
लोकशाहीर पुंडलिक फरदि यांनी आपल्या लोकगीतांच्या आधारे महाराष्ट्रभर आपल्या आनेवाडी गावचे नाव पसरविले व गावात या स्मशानभूमोस जागाही दिली, त्यामुळे ग्रामस्थांनी स्मशानभूमीस (कै.) लोकशाहीर पुंडलिक फरदि वैकुंठधाम असे नावही येण्याचा ठराव घेतला आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!