प्रक्षेत्र प्रशिक्षण शेतक-यांसाठी सुवर्णसंधी
![]()
जास्तीत जास्त शेतक-यांनी अर्ज करून योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी, वाई प्रशांत शेंडे, यांनी केले आहे.
सातारा दि. 23 जिमाका : उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, वाई यांचेमार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२३-२४ करीता मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षण (On farm training) फेब्रुवारी २०२४ मध्ये आयोजित केला जाणार आहे. यामध्ये राज्यातील कृषि विद्यापीठे, राष्ट्रीय कृषि संशोधन संस्था, फलोत्पादन क्षेत्रात विशेष काम करणा-या खाजगी कंपन्या/संस्था. कृषि विभागाची विविध प्रक्षेत्रे, कृषि विज्ञान केंद्रे, हॉर्टीकल्चर ट्रेनिंग सेंटर व भारतीय कृषि संशोधन संस्था (आयसीएआर) अंतर्गत संशोधन संस्था यासारख्या संस्थांमध्ये जाऊन नवनवनविन शोध, प्रगत तंत्रज्ञान, विविध पिक पद्धती, आधुनिक शेतीबाबतची माहिती घेता येणार आहे.
प्रक्षेत्र प्रशिक्षण पुढीलप्रमाणे पार पडणार आहे – पहिला दिवस- ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, फळांचे गाव धुमाळवाडी, के. बी. एक्स्पोर्ट, फलटण, दुसरा दिवस- कृषि विज्ञान केंद्र, बारामती, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था माळेगाव बारामती, तिसरा दिवस- शाश्वत शेती, सेंद्रीय शेती १० ड्रम थेरी नारायणगाव, कांदा व लसुन संशोधन केंद्र राजगुरुनगर, चौथा दिवस- राष्ट्रीय सुगी पश्चात केंद्र तळेगाव दाभाडे, भात संशोधन केंद्र वडगाव मावळ, फळ संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे, पाचवा दिवस- पुष्प संशोधन संचालनालय पुणे, आळिंबी प्रकल्प कृषि महाविद्यालय पुणे, अंजीर व सिताफळ संशोधन केंद्र सासवड. सदर कार्यक्रमामध्ये स्थानिक परिस्थीती व वेळेनुसार बदल करण्यास मुभा असेल.
उपविभागातुन एकुण ३० लाभार्थीची (वय वर्ष १८ ते ६५) निवड केली जाणार आहे. अर्ज संख्या जास्त झाल्यास सोडत पध्दतीने निवड केली जाणार आहे व त्यानुसार ज्येष्ठता सुची तयार करण्यात येईल.
अर्ज करण्यासंदर्भात व योजनाबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा. शेतक-यांचे अर्ज सादर करणेकरीता दि. 25 जानेवारी 2024 अखेर मुदत राहील. या कालावधीत जास्तीत जास्त शेतक-यांनी अर्ज करून योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी, वाई प्रशांत शेंडे, यांनी केले आहे.













