Mon, Mar 2, 2026
अध्यात्म

श्री. क्षेत्र नारायणपूरच्या उत्सव सोहळयाची तयारी पुर्ण, उत्साह शिगेला

श्री. क्षेत्र नारायणपूरच्या उत्सव सोहळयाची तयारी पुर्ण, उत्साह शिगेला
Ashok Ithape
  • PublishedDecember 20, 2023

जिल्हाभरातून दत्त भक्तांच्या दिंडया पायी पालखी सोहळयाने मार्गस्थ, दत्त नाम घोषाणे महामार्ग दुमदुमला तर देशाचे चारही दिशेला चार धाम निर्मितीचे संकल्प पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदाच होणारा दत्त जयंती सोहळा.

भुईंज l प्रतिनिधी :

विश्व चैतन्य सदगुरू नारायण उर्फ आण्णा महाराज यांचे मार्गदर्शनाखाली दत्त सेवेकरी मंडळ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सेवेसाठी सज्ज असल्याची माहिती पोपट महाराज स्वामी, भरतनाना क्षीरसागर व दिगंवर भिंताडे यांनी दिली.

श्री. क्षेत्र नारायणपूर येथे रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ पासून भव्य दत्त जयंती सोहळा साजरा होत असून सोमवार दिनांक २५ डिसेंबर रोजी नारायणपूर येथे दाखल होणा-या पायी दिडयांचे स्वागत तर सायंकाळी सात वाजून तीन मिनीटांनी दत्त जन्म सोहळा साजरा होणार आहे. मंगळवार दिनांक २६ डिसेंबर रोजी पालखी ग्रामप्रदक्षिणा व दत्त जयंती उत्सव सोहळा साजरा होणार आहे. या सोहळयासाठी चारीधामातील शिष्यगण तसेच भाविक उपस्थित राहणार असून हा उत्सव चार धाम संकल्पपुर्ततेनंतर तसेच अमेरिकेत होणा-या परदेशातील पहिल्या दत्त मंदीराचे निर्मिती शुभारंभ झाल्यानंतर उत्साह व देशभरातील दत्त भक्तांच्यासाठी श्रीक्षेत्र नारायणपूर एक लोकसोहळयाचे केंद्र ठरणार आहे अशी माहिती दत्त सेवेकरी मंडळ नारायणपूर यांनी दिली आहे.

श्री. क्षेत्र नारायणपूर जि. पुणे येथील पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला सहा दशकापासून साधना व उपासना करून सिद्ध झालेले श्री. दत्त संस्थान आज देशाच्या चारही दिशेला पोहचले असून एकमुखी दत्त महाराज व सदगुरू आण्णा महाराजांची मानव देहातील उर्जा व प्रवचनातून मिळणारी संस्कार शाळा जात, धर्म, भाषा यापलिकडे जावून पोहचवली आहे. म्हणूनच मानसातील माणूस जागा करणारे व या राज्यातील माणूस त्या राज्यातील माणसापर्यंत समाविष्ठ झाला असून या हृदयीचे त्या हृदयी माणूस जोड अभियानाचे संकल्पमुर्ती म्हणजे श्री. सदगुरू आण्णा महाराज होय.

श्री. क्षेत्र नारायणपूरच्या दत्त महाराजांचे दर्शन घेतानाच कृतार्थ होणारा भाविक आपल्या सुखदुखःची देवाणघेवाण दर्शनाद्वारे दत्त महाराजांच्या डोळयात पाहून संवाद साधतो. दैनंदिन घडामोडीतील प्रश्नांची उत्तरे त्याला सदगुरू आण्णांच्या प्रवचनातून मिळतात. अमृत उपदेश व जीवनाचे संसार चक्रातील मार्गदर्शन त्याला पुढच्या प्रवासाला मार्गस्थ करते. तर महाप्रसादातून मिळणार विश्वास हा श्रद्धा आणि भक्तीचा संगम घडवतो. इथ फक्त श्रद्धा जोपासा अंधश्रद्धा ठेवू नका, गंडे दोरे यांना लांब ठेवून माणूस जोडणा-या नारायणपूरचा महिमा देश विदेशापर्यंत पोहचला आहे.

या परदेशातील पहिले दत्त मंदीर निर्मिती शुभारंभ नुकताच अमेरिका या देशात झाला आहे. देव माणसात शोधा, निर्वव्यसनी रहा, कर्ज काढू नका हे संत गाडगे वावांचे विचार आपल्या कृतीतून देणारे आण्णा महाराजांनी समाज गावोगावी जावून संस्कारीत केला विगर हुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळा, सामुदायिक वृतबंध सोहळा, शिष्यांचे सत्पनीक संस्कार शिवीर यातून सुरू झालेले संस्कार पाठ मुर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहन समारंभाद्वारे गावागावातील सामाजिक ऐक्य व ऐकोपा जोपासला. यातूनच ग्रामस्वच्छता व तंटामुक्तीचा संदेश आण्णांनी चार दशकापूर्वीच दिला आहे. अखंड मानव जातीला कप्ट आणि प्रयल यांची गोळा वेरीज सांगण्यासाठी आडेगाव जि. सोलापूर येथील सामुदायिक शेती प्रकल्प तर वामणोली विनायकनगर जि. सातारा येथील सामुदायिक रवर लागवड हे आण्णांच्या दुरदृष्टीचे प्रयोग त्या त्याठिकाणचेविकासाचे परिवर्तन करणारे क्षेत्र ठरले. त्यामुळेच क्षेत्र महावळेश्वरच्या सात नदयांच्या उगमापासून कांदाटी खो-याच्या संगमापर्यंत साक्षात ब्रम्हा, विष्णू, महेश म्हणजेच दत्त महाराजांचे सर्वस्पर्शी दर्शन ज्या शिष्यांना व अनुयायींना झाले तेच सद्गुरू आण्णा महाराज हे भूलोकीचे स्वर्ग सुख होय.

तर आण्णांच्या तपश्चर्यातून हिंदू धर्मातील सर्व श्रेष्ट आचार्य भृगुमहर्षी यांच्या जिवंत समाधी स्थळाचा जिर्णोद्धार करून तेथे साधकांसाठी ध्यान मंदिर व उर्जेचे धरण भुईंज येथे वांधणारे आण्णा महाराज चकदेव पर्वतापर्यंत पोहचले. मांढरदेवीच्या पायरीपासून मांढव्य ऋपींचा भृगुपुत्र चवणॠषीचा संवाद साधत आजही आण्णा महाराज कन्याकुमारी नजीक अनुसया दत्तधाम निर्मीती करून मानव जातीला देवांबरोबरच ऋषी आणि संत महतांचे महात्मे सांगतात. संत नामदेवांनंतर पंजावात जाणारे व शीख समाजाला अद्यासाची विचारधारा देणारे आण्णा महाराजांनी शीख शिष्यांना समावून घेतले. तर मी एक फकीर असे शिर्डीच्या साईवावा प्रमाणे सांगत सर्वत्र संचार करणारे पण प्रत्येक ठिकाणी नवा संदेश देत मानव जातीचे हीत जोपासणारे आण्णा महाराज आज वयाच्या ८९ व्या वर्षी सुद्धा मानव जातीचा उत्सव पाहतात.

येणा-या प्रत्येकाचे गा-हाने केवळ त्याच्या नजरेतून ओळखत त्याला समाधानाची प्रेरणा देवूनच मार्गस्थ करतात. त्यामुळे भाविकांची श्रद्धा दिवसेंदिवस वाढतच आहे. वृक्षारोपण, मानव संस्कार, व्यसनमुक्ती, सामुदायिक विवाह चळचळ, ग्रंथातून सरळ व सोप्या भाषेत मार्गदर्शन करणारे आण्णा मध्यप्रदेशात नर्मदा नदीच्या किनारी श्री. क्षेत्र जलकोटी पहिले धाम उभारून सर्वप्रथम शिष्यांची सामुदायिक शक्ती काय असते याचा आदर्श निर्माण केला. तदनंतर कन्याकुमारी येथे अनुसया दत्तधाम हे दुसरे धाम उभारून दक्षिण भारत नारायणपुराशी जोडला. श्रमदान व गुरुनिष्ठा यांच्या संगमातून कलकत्यानजीक श्री क्षेत्र व्रम्ह दत्तधाम तिसरे धाम भक्तांच्यासाठी दर्शनासाठी आजहि सज्य आहे. तर चौथे दत्तधाम उत्तराखंड प्रदेशात अत्री दत्तधाम निर्मिती पुर्ण होवून संकल्प पुर्ण झाला आहे.

कोट्यावधी रूपयांची कामे मानवजातीच्या श्रमदानातून व गुरूवरील दृढ विश्वासामुळे पुर्णत्वास जातो हे भल्या मोठ्या विचारवंताना चिंतन करण्यास भाग पाडते. सदगुरू आण्णा महाराज माणसांच्या दैनदिन आरोग्य तकारींचा व अस्वस्थेचा विचार करून निर्सग संपन्न पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला नारायणधाम नावाचे निसर्ग उपचार केंद्र व आर्युवेदिक रूग्णालय सुरू करून रक्तदाव, मधुमेह, मानसिक, अस्थिरता, अस्वस्थता यांच्यावर नारायणधाम येथे निसर्गोपचार करून मानसाला नवसंजीवनी देण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. जिथ आर्युवेदिक वनस्पतींच्या सानिध्यात व दत्त महाराजांच्या सावलीत अनेकांना जीवनाचे नवे रूप मिळणार आहे. प्रत्येक गुरुवारी व पोर्णिमला येणा-या जनसमुदायाला प्रवचनातून कुटुंबातील ऐकोपा वडीलधा-यांना मानसन्मान दया, मुलांना बलवान करा अस सांगताना आण्णा म्हणतात आजच्या पिढीचा कुद्धीचा कॉम्प्युटर आहे. परंतु शरीराचा थर्माकोल आहे यातूनच गावोगावच्या तालमी, व्यायामशाळा, आखाडे नव्याने शोधण्यासाठी सल्ला देतात. सगळ्यांचीच काळजी घेणारे हे संस्कारपीठ पोर्णिमेदिवशी वहानपुजन करताना प्रत्येक वहान मालकांना आशिर्वादातून संरक्षण देते. एका कुटुंबप्रमुखाप्रमाणे लाखो जनसमुदायाचे माऊली म्हणजेच सद्गुरू आण्णा महाराज होय.

या दत्त जयंती सोहळ्यासाठी गिरणार पर्वतापासून विविध महासागर, नर्मदा नदीपासून कन्याकुमारी पर्यतच्या नदयांचे पाणी पायी घेवून शिष्यगण मार्गस्थ झाले आहेत. सोमवार दिनांक २५ डिसेंबर २०२३ दुपारपर्यंत श्री क्षेत्रनारायणपूर येथे पोहचतील असा हा मानसांचा उत्साह व उत्सव पाहून स्वर्गलोक श्री. क्षेत्रनारायणपूर येथे अनुभवन्यासाठी सर्व दत्त भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दत्त सेवेकरी मंडळ नारायणपूर, शिष्यगण सातारा जिल्हा, आचार्य भृगुक्रुषी आश्रम भुईंज, ज्ञानेश्वरी पारायण मंडळ भुईज यांनी केले आहे..

………………………………………………………………………………..

क्षेत्र नारायणपूरला जाणा-या सर्व पायी दिंडयांचे स्वागत भुईज येथे आचार्य भृगुऋषी आश्रम सेवेकरी दत्तसेवेकरी मंडळ नारायणपूर,पारायण मंडळ व ग्रामस्थ भुईज यांच्यावतीने होणार आहे.

…………………………………………………….

देशाच्या चारही दिशेला दत्त महाराजांचे मंदीर व धाम निर्मिती करून महाराष्ट्रातील प्रत्येक भाविक चारही धाम पुर्ण करताना नकळतपणे भारतमातेची प्रदक्षिणा पुर्ण होते हे सुद्धा एक अध्यात्मिक कार्यातील एक महत्त्व असणारे व्रत होय. त्याचे मिळणारे फळ खूप समाधान देते अशा प्रतिकिया अनेक भक्तांनी बोलून दाखवल्या.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!