Mon, Mar 2, 2026
स्थानिक बातम्या

वाई प्रशासनाच्या तात्काळ मदतीमुळे जीवितहानी नाही

वाई प्रशासनाच्या तात्काळ मदतीमुळे जीवितहानी नाही
Ashok Ithape
  • PublishedDecember 17, 2023

प्रांताधिकारी श्री. राजेंद्रकुमार जाधव, तहसिलदार श्रीमती. सोनाली मेटकरी, वाई यांनी केलेल्या तात्काळ मदतीमुळे कोणतीही जीवितहानी अगर पशू हानी झाली नाही.

वाई तालुक्यातील  मौजे पांडे, ता. वाई, जि. सातारा हददीतून जाणारा धोम धरणाचा डावा कालवा दिनांक 16/12/2023 रोजी पहाटे 3.00 चे सुमारास फुटून त्यातील पाणी  मोठया प्रमाणात मौजे ओझर्डे, ता. वाई या गावच्या हददीतील चंद्रभागा ओढयात शिरत असले बाबत स्थानिक ग्रामस्थांकडून तहसिलदार वाई यांना समजलेनंतर  मा. उपविभागीय अधिकारी वाई व तहसिलदार वाई यांनी महसूल प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेसमवेत तात्काळ घटनास्थळी भेट दिली असता मौजे ओझर्डे येथील चंद्रभागा ओढयात पाणी मोठया प्रमाणात वाहत असलेने ओढयाला पुराचे स्वरुप आले होते.

सदर परिस्थितीची पाहणी करुन मा. उपविभागीय अधिकारी, वाई उपविभाग वाई व तहसिलदार वाई यांचे मार्गदशनाखाली महसूल,  पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने ओढयालगत राहत असलेल्या एकूण 29 कुटूंबातील लहान मुले, महिला व इतर सर्व पुरुष असे एकूण 149 ऊसतोड मजूर कामगांराना तात्काळ त्यांचे झोपडयातून बाहेर काढून त्यांना मौजे ओझर्डे येथील शेतकरी जीवणोध्दार विकास सहकारी सेवा सोसायटी यांचे हॉलमध्ये स्थलांतरीत केले.  त्यानंतर सर्व बेघर मजूरांना स्थलांतरीत केलेल्या ठिकाणी आल्पोपहार, पाणी व जेवण तसेच  औषधोपचार पुरविणेत आले.

तसेच त्यांना सर्व जीवनावश्यक, संसारपयोगी सर्व साहित्य, धान्य, व कपडे, चादरी, स्वेटर व इतर तत्सम सर्व साहित्य विविध सेवाभावी संस्थाच्या मदतीने मा. श्री. राजेंद्रकुमार जाधव, उपविभागीय अधिकारी, वाई उपविभाग, वाई  तसेच श्रीमती सोनाली मेटकरी, तहसिलदार वाई यांचे हस्ते ओझर्डे येथील ग्रामस्थांच्या समवेत वाटप करणेत आले.  तसेच सर्व ऊसतोड मजूर कामगांराचे तालुका प्रशासनाने  4 तासाचे आत सुखरुप व सुरक्षित  मोकळया जागेत झोपडया टाकून स्थलांतर करणेत आले. मा. श्री. राजेंद्रकुमार जाधव, उपविभागीय अधिकारी वाई व श्रीमती. सोनाली मेटकरी, तहसिलदार वाई यांनी केलेल्या तात्काळ मदतीमुळे कोणतीही जीवितहानी अगर पशू हानी झाली नाही.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!