Mon, Mar 2, 2026
कृषी वार्ता

नवोदित उद्योजकांनी आपल्या उद्योगात नवनवीन तंत्रज्ञान वापरून वाढ केली पाहिजे – प्रो. संजीव पाटील

नवोदित उद्योजकांनी आपल्या उद्योगात नवनवीन तंत्रज्ञान वापरून वाढ केली पाहिजे – प्रो. संजीव पाटील
Ashok Ithape
  • PublishedNovember 29, 2023

वाई प्रतिनिधी –

“नवोदित उद्योजकांनी यशस्वी उद्योजक होऊन त्यानी सतत आपल्या उद्योगात नवनवीन तंत्रज्ञान व सातत्य वापरून वाढ केली पाहिजे” असे प्रतिपादन प्रशिक्षक प्रो. संजीव पाटील यांनी केले

कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअर सातारा येथे जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकता तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी लिलेश निकम मुख्य प्रशिक्षक महेश महाडिक समन्वयक अभिजित माने प्रशिक्षक श्रीकृष्ण पवार फिल्ड अधिकारी शीतल कदम जिल्हा संसाधन अधिकारी सयाजीराव कदम यांनी प्रमुख उपस्थिती होती.

संजीव पाटील पुढे म्हणाले की कोणताही व्यवसाय करताना अधिक शिक्षणाची व वयाची अट नाही परंतु आपले आर्थिक व्यवहार देणे घेणे व्यवस्थित ठेवले तर बँकांचा आपल्यावर विश्वास निर्माण होऊन आपल्या व्यवसायाला आर्थिक साहाय्य करायला तयार होतात फक्त आपली जिद्द चिकाटी आत्मविश्वास मेहनत निष्ठा व वेळेच नियोजन महत्त्वाचे आहे.

या प्रशिक्षण शिबिरात अन्नप्रक्रिया उद्योगासाठी व्यवसायासाठी निवडलेले मिरची चटणी हळद पापड कडधान्ये डाळ प्रक्रिया दुध जन्य पदार्थ व इतर उत्पादने यांची प्रक्रिया प्याकिंग मार्केटिंग आदी विषयावर माहिती देण्यात आली या शिबिरासाठी वाई खंडाळ शिरवळ महाबळेश्वर व सातारा जिल्ह्यातील अनेक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!