Tue, Mar 3, 2026
अध्यात्म

संत जो मार्ग सांगतात, तो उन्नत आणि सात्विक मार्गच असतो – भावार्थ देखणे .

संत जो मार्ग सांगतात, तो उन्नत आणि सात्विक मार्गच असतो – भावार्थ देखणे .
Ashok Ithape
  • PublishedOctober 6, 2023
दिनांक 7 व 8 ऑक्टोबर रोजी कीर्तनकार ह. भ. प. सौ. गौरीताई खांडेकर यांचे सुश्राव्य. कीर्तन.
सातारा6.. येथील समर्थ सदनमध्ये  श्री क्षेत्र सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने चातुर्मास उपक्रमांतर्गत पुणे येथील जेष्ठ निरूपणकार स्वर्गीय रामचंद्रजी देखणे यांचे चिरंजीव व युवा प्रवचनकार भावार्थ देखणे यांनी दोन दिवसीय प्रवचन मालेत ज्ञानेश्वरीतील ओवी वर अतिशय सुरेख विवेचन केले. यावेळी आपल्या प्रवचन मालेत बोलताना भावार्थ देखणे म्हणाले की हे परंपरेचे प्रवचन होते .ही परंपरेची सेवा आहे .  ज्ञानेश्वरी च्या सहाव्या अध्यायातील १५६ व्या क्रमांकाची ही ओवी आहे .
पाठी महर्षि येणे आले ।साधकाचे सिध्द झाले । आत्मविद स्थिरावले ।येणेची पंथे॥या ओवीवर प्रवचन केले.या ओवीला अनुसरून विस्तृत मार्गदर्शन करताना देखणे म्हणाले की. या मार्गाने महार्षी लोक, संत , महंत मार्गक्रमण करत आले आहेत त्या मार्गाने सामन्यांनी मार्गक्रमण करावे. संत जो मार्ग सांगतात तो उन्नत आणि सात्विक मार्गच असतो ,अश्या मार्गाने जर आपण चललो तर आपण सहज रित्या हा भवसागर पार करू शकतो ..
याच मार्गावर साधक म्हणजे सामान्य माणसे अली की सांसारिक असताना सुद्धा सिद्ध अवस्थेला जातात. जीवन जागताना ४ आश्रम , ४ पुरुषार्थ  कसे आत्मसात करायचे आणि योग्य रित्या ते आचरले तर जीवन सिद्ध अवस्थेला जाते.या प्रवचन मालेच्या सांगता प्रसंगी श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने जेष्ठ समर्थ भक्त रमेश बुवा शेंबेकर रामदासी यांच्या हस्ते भावार्थ देखणे यांचा सत्कार करण्यात आला शनिवार आणि रविवारी दिनांक 7व 8ऑक्टोबर रोजी पुणे येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. सौ. गौरीताई खांडेकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
उपक्रमांतर्गत या सर्व कीर्तन कार्यक्रमांसाठी संवादिनीवर  साथ   बाळासाहेब चव्हाण यांच्या असून तबला साथ विश्वनाथ पुरोहित हे करणार आहेत .या सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सातारकरांनी उपस्थित राहून चातुर्मासाचा हा कार्यक्रम यशस्वी पार पाडावा असे आवाहन मंडळाचे वतीने कार्यवाह समर्थ भक्त योगेशबुवा रामदासी ,उपकार्यध्यक्ष गोडबोले व मंडळाचे अध्यक्ष समर्थ भक्त गुरुनाथ महाराज कोटणीस यांनी केले आहे. तसेच हे सर्व कार्यक्रम समर्थ सदनचे व्यवस्थापक प्रवीण कुलकर्णी गुरुजी ,मुरलीधर उर्फ राजू कुलकर्णी सौ .कल्पना ताडे ,राजाभाऊ कुलकर्णी ,रवीबुवा आचार्य , देसाई वहिनी आदी सहकार्यांच्या विशेष परीश्रमातून संपन्न होत आहेत.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!