Sat, May 30, 2026
Close

Recent Posts

कृषी वार्ता

शेतकऱ्यांना लाभ देताना निकषांचे समान पालन करा – अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने  

शेतकऱ्यांना लाभ देताना निकषांचे समान पालन करा – अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने  
Ashok Ithape
  • PublishedMarch 23, 2026

सातारा दि. 23:  कृषी विभागाने शेतकऱ्यांना लाभ देताना शासनाने घालून दिलेल्या निकषांचे सर्व तालुक्यांमध्ये समान पद्धतीने पालन करणे बंधनकारक आहे. कोणत्याही पात्र शेतकऱ्याला लाभापासून वंचित ठेवू नये, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

अनेक शेतांमध्ये विद्युत तारा जमिनीलगत किंवा खूप खाली आल्या आहेत. यामुळे जीवितहानी किंवा मोठे अपघात घडण्याची शक्यता आहे. महावितरणने तातडीने या तारा उंच करण्याचे काम हाती घ्यावे. शहरातील विस्कळीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी बंद असलेली सिग्नल यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करावी.   गोडोली ते मोळाचा ओढा या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करावा, जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्या सुटेल.

या बैठकीत ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांनी विविध समस्या मांडल्या यावर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे निर्देशही अप्पर जिल्हाधिकारी श्री. माने यांनी दिले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!