Thu, Feb 26, 2026
सामाजिक

समोर येणाऱ्या व्यक्तिचा आदर करणे म्हणजे जीवन – जयवंतराव आवटे

समोर येणाऱ्या व्यक्तिचा आदर करणे म्हणजे जीवन – जयवंतराव आवटे
Ashok Ithape
  • PublishedFebruary 26, 2026

महाआरोग्य व रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त सहभाग

दि. २६ l भुईंज  : आपल्या समोर येणाऱ्या व्यक्तिचा शक्य तिथका आदर करणे म्हणजे जीवन होय. या सुसंस्कृत जीवनाच अंगिकार करायचा असेल तर सकस माणसं आणि सकस साहित्याशी संबंध असणे गरजेचे आहे. सकस माणसाची संगत आपल्याला वर्तमानमध्ये मिळत असते. परंतु सकस माणसांची संगत मिळत असताना ती माणसं आयुष्यभर आपल्या सोबत असु शकत नाहीत. मग त्यावेळेला त्यांच्या आठवणींना उजाळा द्यावा लागतो, त्यांच्या आठवणी घेऊन आयुष्यात पुढे जावे लागते त्यापध्दतीनं आपण सर्वजण माजी खासदार लक्ष्मणरावतात्या पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र आलो आहोत आणि याकरिता आपण मला या ठिकाणी बोलावलं हे मी माझं भाग्यच समजतो, असे गौरवोदगार वाळवा जि. सांगली येथील कथाकथनकार-वक्ते जयवंतराव आवटे यांनी काढले.

किसन वीर कारखान्याचे माजी चेअरमन, सातारा जिल्हा बँकेचे माजी चेअरमन तथा सातारा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार स्व. लक्ष्मणरावतात्या पाटील यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, दत्तानाना ढमाळ यांची प्रमख उपस्थिती होती.

व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे म्हणाले की, स्व. लक्ष्मणरावतात्यांनी सामाजिक राजकीय क्षेत्रात सर्वसामान्य कार्यकर्त्याल मोठं करण्याचं काम केले. राजकीय जीवनात उभं करताना कार्यकर्त्याला भक्कमपणे साथ दिली. तात्यांनी त्यांच्या संपुर्ण राजकीय जीवनात सहकारी संस्था वाचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहिले. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदआबा पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील हे दोघेही तात्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवीत पुढे वाटचाल करीत असून अडचणीतील कारखाना ताब्यात घेऊन तो पुर्ववत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. लक्ष्मणरावतात्यांनी राजकारणात जो सुसंस्कृत मार्गाने जाण्याचा रस्ता दखविलेला आहे, त्याच मार्गाने त्यांचे कार्यकर्ते जाताना दिसत असल्याचा आनंद होत असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमधील विजयी उमेदवार हर्षदा फरांदे, वर्षा जगताप, राणी पवार, शैलेश सपकाळ, भैय्यासाहेब डोंगरे, संजयराव आवटे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

किसन वीर कारखाना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मिरज येथील सेवासदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शेंद्रे-सातारा येथील ऑन्को लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, भुईज येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर व सातारा येथील बालाजी ब्लड बँकेमार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तुही देण्यात आल्या. या शिबीरामध्ये ब्लड प्रेशर ३९५, शुगर २५६, रक्ततपासणी २८५, कॅन्सर तपासणी १२५, डोळ्यांची तपासणी ४७० यामधील मोतिबिंदू ऑपरेशकरिता ३५ रूग्णांना पुढील शस्त्रक्रियेसाठी बोलविण्यात आलेले असृन त्यांना मिरज येथे शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यावेळी ईसीजी १८० तसेच इतर तपासणी जवळपास ५० रूग्णांची करण्यात आलेली आहे. ८१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. महाआरोग्य शिबीर यशस्वी करण्यासारठी विकास बाबर, रवी जाधव, कारखान्याचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

यावेळी कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंद्राव तरडे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, सुशिला जाधव, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, प्रताप पवार, शशिकांत पवार, शिवाजीराव महाडीक, श्रीकांत वीर, संपतराव शिंदे, मानसिंगराव साबळे, अरविंद कदम, बबनराव साबळे, अजय कदम, शिवाजीराव काळे, ज्ञानदेव शिंगटे, बाळकृष्ण साबळे आत्माराम सोनावणे, संपतराव वाघ, रमेश गायकवाड, पोपट जगताप, संजय मोहोळकर, चंद्रकांत ढमाळ, किरण साबळे-पाटील, लालासाहेब शिंदे, कुमार बाबर, चंद्रकात फडतरे दिलीप वाडकर, श्रीमःत झांजुणें, सुरेश बाबर, अर्चना पवार, कांतीलाल पाटील, प्रमोद वारागडे, दादासाहेब शिंदे, राजेंद्र सोनावणे, किरण जाधव, मोहन पवार, कांतीलाल पवार, स्थानिक संस्थाचे पदाधिकारी, शेतकरी, कार्यकर्ते, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!