Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

साताऱ्यातील 80 वर्षे मैत्रीचे अतूट नाते जपणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल मधील मित्रांनी साजरा केला सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा

साताऱ्यातील 80 वर्षे मैत्रीचे अतूट नाते जपणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल मधील मित्रांनी साजरा केला सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा
Ashok Ithape
  • PublishedFebruary 3, 2025
मैत्री एक हवंहवंसं वाटणारं आपुलकीचं नातं. मैत्रीच्या नात्यात कोणतीही बंधनं नसतात. जगातील सर्व नात्यांच्या पलीकडे असलेलं मैत्रीचं नातं आयुष्यभर साथ देतं. मैत्रीचे हे बंध एकमेकांशी कधी जुळतात हे कोणालाच कळत नाहीत. आईवडीलांमुळे निर्माण झालेली नाती आपल्याला कुटुंबाकडून मिळतात. प्रेम आणि आपुलकी असलेली रक्ताची ही नाती आपल्याला आयुष्यभर सोबत करतात. पण मैत्रीची नाती काही वेगळीच असतात. याचंच एक अनोखं उदाहरण म्हणजे साताऱ्यातील बालमित्रांनी एकत्र येत सहस्रचंद्रदर्शन सोहळा साजरा केला आहे.1961 साली साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयातून त्यांची 10वी पूर्ण झाली. यामध्ये बालपणापासून आज वयाच्या 80तही एकमेकांचे ऋणानुबंध तितकेच घट्ट असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. यावेळी या बालमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. जिथे विचार जुळतात तिथे मैत्री फुलते. शेवटच्या इनिंगच्या कट्टय़ावर मैत्रीचे हास्याचे फवारे उडतात तर कधी सुख-दुःखाच्या गोष्टीं सांगितल्या जातात. अशा वेळी थरथरलेले हात एकमेकांना साथ देताना दिसतात. हे यांच्या मैत्रीतील एक भावनिक वास्तव आहे. सहस्त्रचंद्रदर्शन हा एक धार्मिक तसेच सामाजिक समारंभ आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात १००० पौर्णिमा येऊन गेल्या की हा समारंभ करता येतो. या सहस्रचंद्रदर्शन समारंभाच्या दिवशी नातेवाईकांच्या आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत एक होमहवनादी धार्मिक विधी करण्यात येतो. जगातील सर्वात सुंदर , सहज आणि निकोप मैत्रीचे नाते आज या कार्यक्रमात पाहायला मिळाले. आयुष्याच्या सांजवेळी एकटेपणा दूर करण्यासाठी बालमित्रांची सोबत असणारे मित्र फारच नशीबवान असतात हे आज दिसून आले.
यावेळी शंकर खुर्द, विजय केसकर, तारानाथ गोळीवडेकर, रमेश ठोंबरे, मनोहर अष्टावधानी, सुधीर बोकील, त्रिंबक ननावरे, सतीश गोडबोले, सुरेश भस्मे, माधव गुरव, अनिल कोल्हापुरे, विजय बाकरे, अशोक वाळिंबे, नारायण दोशी, बाळासाहेब आंबेकर या सर्व बालमित्रांनी एकत्र येत हा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा साजरा केला. म्हातारपण हे देवाने माणसाला दिलेलं दुसरं बालपणच आहे आणि या वयामध्ये संपूर्ण आयुष्य समाधानी आणि आनंदीने पूर्ण जगावं असे वाटत असतं. आजच्या तरुण पिढीबरोबर जुळवून घेताना त्यांचे मन राखताना स्वतःची आवड, छंद बाजुला ठेवावे लागतात अस हे म्हातारपण असत.
वृद्धापकाळात दोन गोष्टीं हाताशी असतात. एक म्हणजे निवृत्तीनंतर मिळालेलां वेळ आणि दुसरी कमतरता ती म्हणजे जवळच्या माणसांचा सहवास.  हे मित्र महिन्यातून एकदा सर्वजण एकत्रित येऊन गप्पा गोष्टी करणे, सहलीला जाणे, जेवण करणे, कुणाची आर्थिक अडचण असेल त्यांना मदत करणे, अश्या पद्धतीची यांची अनोखी मैत्री अश्या 18 वर्षाच्या तरुण मित्रांना लोकवृत्तचा सलाम.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!