Sat, May 30, 2026
Close

Recent Posts

सातारा जिल्हा

‘आबासाहेब वीर’ पुरस्काराने नितीन गडकरी यांचा गौरव! किसन वीर कारखान्यावर रंगणार भव्य पुरस्कार वितरण सोहळा

‘आबासाहेब वीर’ पुरस्काराने नितीन गडकरी यांचा गौरव! किसन वीर कारखान्यावर रंगणार भव्य पुरस्कार वितरण सोहळा
Ashok Ithape
  • PublishedMay 12, 2026

किसन वीर सहकारी साखर कारखान्यावर १५ मे रोजी होणार पुरस्कार वितरण सोहळा; विविध मान्यवर मंत्र्यांची उपस्थिती अपेक्षित

वाई, दि. १३ मे २०२६ : किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार २०२५” यावर्षी भारताचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व नववहन मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर करण्यात आला असून, या पुरस्काराचे वितरण शुक्रवार दि. १५ मे रोजी दुपारी २ वाजता कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.

मूळतः हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि. ९ मे रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र, ढगाळ वातावरणामुळे नितीन गडकरी यांच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण होऊ न शकल्याने कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्यावेळी गडकरी यांनी लवकरच नवीन तारीख देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार आता शुक्रवार दि. १५ मे रोजी ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.

या पुरस्काराचे वितरण विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन मकरंद पाटील राहणार आहेत.

कार्यक्रमास राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील तसेच सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शुक्रवार दि. १५ मे रोजी दुपारी २ वाजता होणाऱ्या या भव्य पुरस्कार वितरण समारंभास कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तोडणी वाहतूक मुकादम तसेच वाहतूक कंत्राटदारांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे आणि कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!