Wed, Jul 22, 2026
सामाजिक

ज्ञानगंगेची अखंड वाहती ज्योत; सौ. संगीता मुके यांना ‘राज्यस्तरीय उत्कर्ष पुरस्कार’ प्रदान

ज्ञानगंगेची अखंड वाहती ज्योत; सौ. संगीता मुके यांना ‘राज्यस्तरीय उत्कर्ष पुरस्कार’ प्रदान
Ashok Ithape
  • PublishedMay 12, 2026

विद्यार्थ्यांच्या यशासाठी २४/७ झटणाऱ्या ‘आय कॅन इन्स्टिट्यूट’च्या प्रेरणादायी शिक्षिकेच्या कार्याचा गौरव

वाई : उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्था, वाई यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय उत्कर्ष पुरस्कार सोहळ्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. संगीता विनोद मुके यांना “राज्यस्तरीय उत्कर्ष पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सत्यवती जोशी सभागृहात पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात कला, कृषी, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, औद्योगिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

‘आय कॅन इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून कृष्णाकाठी वाईमध्ये ज्ञानगंगा प्रवाहित ठेवणाऱ्या सौ. संगीता मुके या शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी २४ तास समर्पित भावनेने कार्य करणे हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख ठरली आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून त्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, आपल्या मेहनत, समर्पण आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या जिव्हाळ्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये विशेष विश्वास निर्माण केला आहे. मागील पाच वर्षांपासून ‘आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने झटत आहेत.

सैनिक स्कूल, नवोदय, स्कॉलरशिप तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी त्या केवळ अध्यापनच करत नाहीत, तर प्रसंगी आर्थिक मदत करूनही विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात.

शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्येही त्या सक्रिय सहभागी असतात. उत्तम व्यवस्थापन कौशल्य, मातृहृदयी माया, अभ्यासू वृत्ती आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ यामुळे त्यांना समाजात विशेष आदराचे स्थान प्राप्त झाले आहे.

आज संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पालक आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’कडे विश्वासाने पाहत आहेत. ज्ञान, संस्कार आणि समर्पण यांच्या बळावर हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या सौ. संगीता मुके यांचा हा सन्मान शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!