Thu, Jun 4, 2026
योजना

कुशल महाराष्ट्र – रोजगार युक्त महाराष्ट्र हे ध्येय समोर ठेवून जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजका विभागाचे काम

कुशल महाराष्ट्र – रोजगार युक्त महाराष्ट्र हे ध्येय समोर ठेवून  जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजका विभागाचे काम
Ashok Ithape
  • PublishedJune 6, 2025

कुशल महाराष्ट्र – रोजगार युक्त महाराष्ट्र हे ध्येय समोर ठेवून बेरोजगार हातांना काम मिळून देणे व उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ विकसित करणे यासाठी जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजका विभाग कार्य करित आहेत. एप्रिल 2024  ते  मे 2025 अखेर 24,066 उमेदवारांनी नावनोंदणी केली आहे. जिल्ह्यातील एकूण नोंदणीकृत उमेदवार यांची संख्या 2,21,076  एवढी आहे.सध्या जिल्ह्यामध्ये एकूण 6090 उमेदवार कौशल्य विकास प्रशिक्षण घेत आहेत.

 धोरण :

   कुशल मनुष्यबळ निर्माण करणे तसेच युवकांच्या नावीन्यपूर्ण नवसंकल्पनांना वाव देण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी. हा विभाग कार्य करित आहे.

 नाव नोंदणी व रोजगार मार्गदर्शन :

या विभागाच्या  पोर्टल वरुन उमेदवारांना ऑनलाइन नाव नोंदणी, नोंदणीचे नूतनीकरण, पात्रतेत वाढ, पत्ता बदल इत्यादि करण्याची सुविधा उपलब्ध आहेत. तर उद्योजकांसाठी रिक्त पदे अधिसूचित करणे, विवरण पत्र भरणे इ. सुविधा उपलब्ध   आहेत.

कौशल्य विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना यामध्ये

  • प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY 4.0)- केंद्र पुरस्कृत राज्य व्यवस्थापित
  • प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान – PMKUVA
  • किमान कौशल्य विकास कार्यक्रम – जिल्हा नियोजन समिती
  • आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ACKVK
  • प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र PM-GKVK यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रामध्ये अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्मिती करून नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या सर्व योजना राबविण्यात येत आहेत. विविध स्टार्ट अप सक्षम करण्यासाठी आर्थिक व इतर अनुषांगिक सहाय्य करणे, विविध सुविधा उपलब्ध करून स्टार्टअप ईकोसिस्टीमला विकसित करणे, नवीन व जागतिक दर्जाचे इनक्यूबेटर्स स्थापित करणे, महाराष्ट्र व्हर्च्युअल इनक्यूबेटर्सचा विकास करणे, व्यवसाय योजना स्पर्धेसारख्या जिल्हास्तरीय कार्यक्रमांचे आयोजन करणे, कार्यशाळा व इतर संवादाद्वारे या धोरणाबद्दल जिल्ह्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे

मार्गदर्शन सेतू या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , सातारा व यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे.

मार्गदर्शन सेतू या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा सामंजस्य करारही दोन वर्षापूर्वी झालेला आहे. या माध्यमातून   जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ४ सत्रांमध्ये  ६०० हून अधिक उमेदवारांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले गेले आहे व काही मार्गदर्शन सत्र नियोजित आहेत.

 उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि कोणत्याही शुल्काशिवाय नियोक्त्याला योग्य उमेदवार उपलब्ध करून देण्यासाठी नियोक्ता आणि नोकरी शोधणाऱ्यांना एकाच छता खाली आमंत्रित करण्यासाठी जिल्हयामध्ये एप्रिल2024  ते मे-2025  या वर्षामध्ये 06 ऑफलाईन रोजगार मेळाव्याद्वारे  247 उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) :

उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करुन उद्योजकांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे.

 योजनेची ठळक वैशिष्टे :

Ø  कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 11 महिने  आहे.

Ø  प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे विद्यावेतन दरमहा लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात (DBT) जमा होणार.

Ø  उमेदवारांनी 11 महिन्याचे  प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आस्थापनांकडून अनुभव प्रमाणपत्र ‍ प्राप्त होणार.

Ø  किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागास पात्र.

 आस्थापना/उद्योजकासाठी आवश्यक पात्रता :

Ø  आस्थापना / उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा.

Ø  आस्थापना / उद्योजकाने विभागाच्या https://cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.

Ø  आस्थापना / उद्योगाची स्थापना किमान ३ वर्षा पूर्वीची असावी.

Ø   आस्थापना / उद्योगांनी Certificate of incorporation व उद्योग आधार यापैकी एक व EPF, ESIC, GST, , DPIT यापैकी एक असे एकुण दोन प्रमाणपत्र आवश्यक असतील.

उमेदवारांसाठी आवश्यक पात्रता :

Ø  उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

Ø  उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.

Ø  शैक्षणिक किमान पात्रता १२वी पास/आयटीआय/पदविका/पदवीधर/पदव्युत्तर

Ø   शिक्षण चालू असलेले उमेदवार पात्र असणार नाहीत.

Ø  उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.

Ø  उमेदवाराने विभागाच्या https://cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.

 शैक्षणिक अर्हतेनुसार विद्यावेतनाचे विवरण

१२ वी पास रु.६,०००/-, आय.टी.आय/ पदविका रु. ८,०००/-, पदवीधर/पदव्युत्तर रु.१०,०००/- प्रतिमाह विद्यावेतन देण्यात येते.

सदर योजनेमधून आजपर्यंत 3470 उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. त्यामध्ये 2490 शासकीय आस्थापनांमध्ये व 980 प्रशिक्षणार्थी खाजगी आस्थापनांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.

ज्या तरुण-तरुणींनी रोजगारासाठी व व्यवसायासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे त्यांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवीन प्रशासकीय इमारत, तळमला, सातारा येथे संपर्क साधावा. त्यांना निश्चितपणे प्रशिक्षणाबरोबर रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन दिला जाईल, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे  सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी सांगितले आहे.

                                                                                  राहूल पवार : जिल्हा माहिती कार्यालय, सातारा

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!